तलाव क्षेत्रातही खाते उघडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2018 05:35 AM2018-06-10T05:35:26+5:302018-06-10T05:35:26+5:30

हवामान खात्याच्या अंदाजानुसार पावसाने मुंबईत दमदार एन्ट्री मारली आहे. मुंबईस्थित तुळशी आणि विहार तलाव क्षेत्रातही दिवसभर मुसळधार पाऊस झाला, तर मुंबईबाहेरील मोडक सागर तलावातही पावसाने खाते उघडले आहे.

 The account opened in the pond area | तलाव क्षेत्रातही खाते उघडले

तलाव क्षेत्रातही खाते उघडले

Next

मुंबई : हवामान खात्याच्या अंदाजानुसार पावसाने मुंबईत दमदार एन्ट्री मारली आहे. मुंबईस्थित तुळशी आणि विहार तलाव क्षेत्रातही दिवसभर मुसळधार पाऊस झाला, तर मुंबईबाहेरील मोडक सागर तलावातही पावसाने खाते उघडले आहे.
गेल्या वर्षी तलाव क्षेत्रात चांगला पाऊस होऊन वर्षभराचे पाण्याचे टेन्शन मिटले होते. तसेच कोणत्याही प्रकारची पाणीकपातही यंदा लागू करावी लागली नाही. त्यामुळे या वर्षी मुंबईकरांची पाण्यासाठीची वणवण टळली. या वर्षीही चांगला पाऊस होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
त्याप्रमाणे जूनच्या पहिल्याच आठवड्यात हजेरी लावत तलाव क्षेत्रात रिपरिप सुरू ठेवली आहे. तुळशी व विहार तलावात अनुक्रमे ७५ व १४६ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. मुंबईला होणाऱ्या पाणीपुरवठ्यात या तलावांचा छोटा वाटा आहे. मात्र हे तलावही टंचाईच्या काळात दिलासा देतात.

3750 दशलक्ष लीटर्स मुंबईला दररोज पाणीपुरवठा होतो.

4200 दशलक्ष लीटर्स एवढी मुंबईत पाण्याची मागणी दररोज आहे.

ं25-30%
दररोज म्हणजे सुमारे नऊशे दशलक्ष लीटर्स पाणी गळती व चोरीमध्ये वाया जात आहे.

मुंबईला वर्षभर चांगला पाणीपुरवठा होण्यासाठी तलावांमध्ये १ आॅक्टोबर रोजी १४ लाख ४७ हजार दशलक्ष लीटर जलसाठा असणे आवश्यक आहे.

Web Title:  The account opened in the pond area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.