मुंबई : कोल्डमिक्सचा वापर अचूक पद्धतीने केल्यास मुंबईकरांची खड्ड्यांपासून कायमची सुटका होऊ शकेल, असा दावा मनपाच्या एका अधिकाऱ्याने खासगीत बोलताना केला आहे. मुंबईत असलेल्या एकमेव प्लँटमध्ये आतापर्यंत २८० मेट्रिक टनहून अधिक कोल्डमिक्सचे उत्पादन झाले आहे. सुमारे अडीच हजार मेट्रिक टन कोल्डमिक्सचे उत्पादन करण्याचा मनपाचा मानस असल्याचेही संबंधित अधिकाऱ्याने सांगितले.तूर्तास मनपाकडून कोल्डमिक्स भरल्यानंतरही पडलेल्या खड्ड्यांच्या कारणांचा मागोवा घेतला आहे. कारण कोल्डमिक्स हे आधुनिक तंत्रज्ञान अधिक फायदेशीर असून पाण्यातही खड्डे बुजविण्याचे तंत्र त्यात असल्याचेही अधिकाºयाने आवर्जून सांगितले. मे महिन्याच्या अखेरीस मनपाच्या २४ वॉर्डमधील कर्मचाºयांना कोल्डमिक्सच्या मदतीने खड्डे बुजविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले होते. ६ इंचांहून कमी लांबीची खडी, डांबर आणि अॅक्वा ग्रीन कंपनीच्या एका केमिकलच्या मदतीने कोल्डमिक्स तयार केले जात आहे. मात्र पावसात कोल्डमिक्सचे उत्पादन करताना अडचणी निर्माण होतात. मुळात सुक्या खडीच्या मदतीने कोल्डमिक्स तयार केले जाते. मात्र पावसामुळे खडी ओली राहत असल्याने उत्पादनाला ब्रेक लागत आहे. एका दिवसात कमाल ३३ टन उत्पादन मनपा घेत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.महत्त्वाची बाब म्हणजे वरळी सी-लिंकवर पडलेले खड्डे मे महिन्यात मनपाने कोल्डमिक्सच्या मदतीनेच बुजविले होते. अद्याप ते खड्डे उखडले नसल्याने योग्य तंत्रज्ञान आणि अचूक पद्धतीचा वापर केल्यास कोल्डमिक्समुळे मुंबई खड्डेमुक्त होऊ शकते, असा दावा मनपाकडून करण्यात येत आहे.खड्डे बुजविताना कर्मचाºयांनी आधी गोल, त्रिकोण, चौकोन किंवा आयत आकारात खड्ड्यांना आकार द्यावा.खड्ड्यांना योग्य किनार आल्यानंतरच कोल्डमिक्सचा वापर करावा.खड्ड्यांच्या तळाशी कठीण जमीन असल्यावरच कोल्डमिक्स ओतावे. कारण कठीण परिसराची धर असल्याशिवाय कोल्डमिक्स कार्य करीत नाही.कोल्डमिक्स ओतल्यानंतर त्यावर योग्य दाब देऊन खड्डा बुजविण्याची गरज आहे; अन्यथा कोल्डमिक्स खड्ड्यातून बाहेर येते.अवघ्या १५ मिनिटांपर्यंत योग्य दाब दिल्यास कितीही पावसात कोल्डमिक्स जागा सोडत नाही....म्हणून कोल्डमिक्स उपयोगी!मे महिन्यात घेतलेल्या कार्यशाळेत मुंबईतील खड्ड्यांत पाणी ओतून ते योग्यप्रकारे बुजविण्याचे काम मनपाने करून दाखविले होते. डांबर आणि खडीला पाणी लागल्यास ते उखडते.मात्र पाण्याला विरोध करायचा गुणधर्म कोल्डमिक्समधील केमिकलमध्ये आहे. म्हणूनच ज्या खड्ड्यांत कोल्डमिक्स भरल्यानंतरही ते उखडले आहेत, त्या ठिकाणी तंत्रज्ञानाची चूक नसून कर्मचाºयांच्या हाताळणीची चूक असल्याचे एका वरिष्ठ अधिकाºयाने सांगितले.म्हणूनच कोल्डमिक्स भरल्यानंतर उखडलेल्या खड्ड्यांची माहिती अधिकारी मागवत आहेत. जेणेकरून तेथील अचूक कारणे मनपाला मिळतील व त्याप्रकारे सुधारणा करून खड्डे बुजविता येतील.
अचूक पद्धतीने केलेले कोल्डमिक्स ठरेल यशस्वी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2018 1:00 AM