Join us

मकोका व बेकायदा कृत्याचा आरोप एकाचवेळी

By admin | Published: April 29, 2015 1:54 AM

आरोपीवर मकोका व बेकायदा कृत्य, असे दोन्ही आरोप एकाचवेळी ठेवले जाऊ शकतात, असा निर्वाळा उच्च न्यायालयाने मंगळवारी दिला.

मुंबई : आरोपीवर मकोका व बेकायदा कृत्य, असे दोन्ही आरोप एकाचवेळी ठेवले जाऊ शकतात, असा निर्वाळा उच्च न्यायालयाने मंगळवारी दिला. पुणे येथील जंगली महाराज रोडवर १ आॅगस्ट २०१२ रोजी पाच बॉम्बस्फोट झाले होते. याप्रकरणी पोलिसांनी फिरोज ऊर्फ अब्दुल सय्यदला अटक केली. या आरोपींवर मकोका व बेकायदा कृत्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.याविरोधात सय्यदने पुणे मकोका विशेष न्यायालयात अर्ज दाखल केला होता. मकोका हा स्वतंत्र कायदा आहे. संघटित गुन्हेगारीतील आरोपींवर याअंतर्गत गुन्हा दाखल केला जातो. तर बेकायदा कृत्यासाठीही स्वतंत्र कायदा आहे. माझ्यावर बॉम्बस्फोटाचा कट रचणे व बॉम्ब ठेवणे असा आरोप आहे. या एकाच गुन्ह्यासाठी दोन स्वतंत्र कायद्याअंतर्गत आरोप ठेवला जाऊ शकत नाही, असा दावा सय्यदने अर्जात केला होता.दहशतवादी कृत्य, संघटित गुन्हेगारीच्या व्याख्येत येत नसल्याचे नमूद करीत पुणे विशेष न्यायालयाने सय्यदवरील मकोका काढून टाकला. याविरोधात राज्य शासनाने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्या. पी. व्ही. हरदास यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. (प्रतिनिधी)विशेष न्यायालयाचा निर्णय रद्ददहशतवादी कृत्य संघटित गुन्हेगारीच्या व्याख्येत येत नसल्याचे विशेष न्यायालयाचे निरीक्षण चुकीचे आहे. त्यामुळे सय्यदवरील मकोका काढून टाकण्याचा विशेष न्यायालयाचा निर्णय रद्द करावा, अशी मागणी शासनाने याचिकेत केली होती. वरील निर्वाळा देत न्यायालयाने पुणे विशेष न्यायालयाचा निर्णय रद्द केला.