मुंबई : हद्दपार केलेल्या पोलीस अभिलेखावरील सराईत आरोपीला सातरस्ता येथून आग्रीपाडा पोलिसांनी अटक केली. मोहम्मद इमरान अश्रफ अन्सारी उर्फ ललवा (२४) असे त्याचे नाव आहे. त्याला परिमंडल तीनच्या उपायुक्तांनी जुलै २०१९ मध्ये मुंबईसह ठाणे, नवी मुंबईतून दोन वर्षांसाठी हद्दपार केले होते.
...................................
नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी २७ हजार गुन्हे
मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या विविध नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी २० जानेवारीपर्यंत मुंबईत २७ हजार ६४४ गुन्हे नोंद करण्यात आले. यात, सार्वजनिक ठिकाणी गर्दी, अवैध वाहतूक तसेच विनामास्क फिरणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. बुधवारी अवघ्या ४ गुन्ह्यांची नोंद झाली.
.....................................
ऑनलाईन दारूसाठी मोजावे लागले ९० हजार
मुंबई : ताडदेवमधील महिलेला ऑनलाईन दारूसाठी ९० हजार ४२३ रुपयांचा फटका बसला. आरोपीने त्यांना व्हाॅट्सॲपवर क्युआर कोड पाठविला. ताे स्कॅन करताच त्यांच्या खात्यातून ही रक्कम वजा झाली. महिलेने याप्रकरणी ताडदेव पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी बुधवारी गुन्हा नोंद केला.
............................
राज्यभरात अनेक तरुणी कास्टिंग काउचच्या शिकार
मुंबई : गुन्हेगारी गुप्तवार्ता विभागाने कास्टिंग काउचचा प्रकार उघडकीस आणून, कास्टिंग डायरेक्टर संदीप इंगळेसह दोन महिलांना अटक केली. जुहू येथे केलेल्या कारवाईत ८ जणींची सुटका केली. राज्यातील अनेक तरुणी संदीपच्या जाळ्यात अडकल्याचा संशय असून, पथक अधिक तपास करत आहे.
.........................................
अमली पदार्थविराेधी पाेलिसांची धडक कारवाई
मुंबई : मुंबईत ड्रग्ज विरोधात मुंबई पोलिसांकडून धडक कारवाई सुरू आहे. अमली पदार्थविरोधी पथकाच्या या कारवाईमुळे ड्रग्ज तस्करांचे धाबे दणाणले आहेत. शिवाय, स्थानिक पातळीवर पोलिसांकडूनही कारवाई सुरु आहे. साध्या गणवेशात पोलिसांकडून ठिकठिकाणी गस्त सुरू आहे.
..........................