गुजरातेतील १८० कोटींच्या ड्रग्ज तस्करीप्रकरणी मुंबईतून आरोपीला अटक, डीआयआरची कारवाई
By मनोज गडनीस | Published: November 8, 2023 07:00 PM2023-11-08T19:00:11+5:302023-11-08T21:07:17+5:30
Crime News: गुजरातमधील वापी येथे अलीकडेच पकडण्यात आलेल्या १८० कोटींच्या अमली पदार्थांच्या प्रकरणातील एका आरोपीला केंद्रीय महसूल गुप्तचर यंत्रणेच्या (डीआरआय) अधिकाऱ्यांनी मुंबईतील नालासोपारा येथून अटक केली आहे.
- मनोज गडनीस
मुंबई - गुजरातमधील वापी येथे अलीकडेच पकडण्यात आलेल्या १८० कोटींच्या अमली पदार्थांच्या प्रकरणातील एका आरोपीला केंद्रीय महसूल गुप्तचर यंत्रणेच्या (डीआरआय) अधिकाऱ्यांनी मुंबईतील नालासोपारा येथून अटक केली आहे. पप्पू अहमद असे या आरोपीचे नाव आहे.
उपलब्ध माहितीनुसार, वापी येथे अलीकडेच एमडी ड्रग्जचा मोठा साठा अधिकाऱ्यांनी जप्त केला होता. या प्रकरणी काही आरोपींना अटक करण्यात आली होती. मात्र, या प्रकरणातील एक मुख्य आरोपी असलेला पप्पू हा तेव्हापासून फरार होता. तो मुंबईत दडून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर डीआरआयच्या गुजरात येथील पथकाने मुंबईत येत त्याला अटक केली आहे. त्याला आता अहमदाबाद येथे नेण्यात आले आहे.