लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : चेंबूर येथील महिलेच्या हत्या प्रकरणातील आरोपी प्रभाकर कुट्टी शेट्टी (३३) यास न्यायालयाने जन्मठेप व एक लाख दहा हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे.
महिला लग्नासाठी तगादा लावत असल्याने २०१४ साली आरोपी शेट्टी याने तिची हत्या केली होती. त्यानंतर धारदार हत्याराने शिर कापून धडावेगळे केले, दोन्ही हात खांद्यापासून वेगळे केले, तसेच दोन्ही पाय तोडून हे अवयव प्लास्टिक बॅगेत भरून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने वेगवेगळ्या ठिकाणी टाकले होते. चेंबूरच्या चरई तलावात मृत महिलेचे धड असलेली प्लास्टिकची बॅग पोलिसांना आढळली होती. या प्रकरणी चेंबूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता. पोलिसांनी आरोपी शेट्टी यास अटक केली होती. अखेर सबळ पुराव्यांच्या आधारे मंगळवारी न्यायालयाने आरोपीस जन्मठेपेची शिक्षा सुनावली.