हुबळी हत्या प्रकरणातील आरोपी एटीएसच्या जाळयात
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2020 13:18 IST2020-11-25T13:18:10+5:302020-11-25T13:18:46+5:30
Hubli murder case : ए.के याला बेडया ठोकल्या.

हुबळी हत्या प्रकरणातील आरोपी एटीएसच्या जाळयात
मुंबई : हुबळी शहरात हत्या करून पसार झालेल्या आरोपी गोलू उर्फ अनुपसिंग उर्फ ए.के उर्फ अनुपसिंग याला दहशतवाद विरोधी पथकाच्या जुहू युनिटने बुधवारी बेडया ठोकल्या आहेत. त्याच्याकडे याप्रकरणी अधिक तपास सुरु आहे.
एटीएसने दिलेल्या माहितीनुसार, ६ ऑगस्ट रोजी इरफान हंचनाळ यांची कर्नाटकच्या हुबळी शहरात भररस्त्यात गोळ्या घालून हत्या करण्यात आली. याप्रकरणी हुबळी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. हत्येनंतर पसार झालेल्या मुख्य आरोपी गोलू बुधवारी अंधेरी परिसरात येणार असल्याची माहिती मिळताच, एटीएसने त्याला अटक केली आहे. याबाबत कर्नाटक पोलिसांना माहिती देण्यात आली असून, गोलूकड़े अधिक तपास सुरु आहे.