धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप, व्हिडीओ केला व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2020 01:58 AM2020-04-30T01:58:28+5:302020-04-30T06:49:02+5:30

व्हिडीओ व्हायरल केल्याप्रकरणी शाहूनगर पोलिसांत तब्लिगी समाजाच्या एका सदस्याने त्यांच्यावर दखलपात्र गुन्हा (एफआयआर) दाखल केला आहे.

Accused of hurting religious feelings, the video went viral | धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप, व्हिडीओ केला व्हायरल

धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप, व्हिडीओ केला व्हायरल

Next

मुंबई  : तबलिगी समाजाच्या लोकांनी शिवीगाळ करत मारहाण केल्याप्रकरणी एका वकिलाने शाहूनगर पोलिसात एनसी दाखल केली होती. याचा व्हिडीओ व्हायरल केल्याप्रकरणी शाहूनगर पोलिसांत तब्लिगी समाजाच्या एका सदस्याने त्यांच्यावर दखलपात्र गुन्हा (एफआयआर) दाखल केला आहे. न्यायालयाने पोलिसांना वकिलावरील आरोपाबाबत विस्तृत अहवाल सादर करण्यास सांगत वकिलाला अंतरिम दिलासा दिल्याचे त्याच्या वकिलांकडून सांगण्यात आले.
अबुझर शेख (४३) या वकिलाने तब्लिगी जमातीच्या लोकांनी शिवीगाळ करत त्याला मारहाण केल्याच्या आरोपाखाली एनसी दाखल केली. तसेच ते त्याच्यावर थुंकले, असा आरोप करत एक व्हिडीओ क्लिप तयार करून ती व्हायरल केली. याप्रकरणी तक्रारदार आतिक शेख (५४) यांनी शाहूनगर पोलीस ठाण्यात अबुझर याच्या विरोधात दखलपात्र गुन्हा (एफआयआर) दाखल केला. शेख हे तब्लिगी समाजाचे सदस्य असून ते राहत असलेल्या डायमंड इमारतीमध्ये ९० टक्के लोक हे तब्लिगी समाजाचे आहेत. व्हायरल व्हिडीओ पाहून इमारतीमधील सात ते आठ जणांनी त्यांना याबाबत सांगितले. त्यानुसार धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी त्यांनी शाहूनगर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी अबुझरविरोधात गुन्हा दाखल केला. मात्र न्यायालयाने त्यांना २० मे, २०२० पर्यंत अंतिम दिलासा दिला आहे. त्यानुसार पोलिसांनी त्याला अद्याप अटक केली नसल्याचेही त्याचे वकील म्हणाले.
>विस्तृत अहवाल देण्याचे निर्देश
माझे अशील अबुझर यांनी आधीच अदखलपात्र गुन्हा दाखल केला होता. तसेच त्यांच्यावर लावण्यात आलेली कलमे ही गंभीर स्वरूपाची असल्याने त्याबाबत विस्तृत अहवाल सादर करण्याचे निर्देश न्यायालयाने पोलिसांना दिले आहेत. त्यानुसार २० मे, २०२० पर्यंत त्यांना दिलासा मिळाला आहे.
- अ‍ॅड. विशाल सत्यप्रकाश सक्सेना,
वकील, सर्वोच्च न्यायालय

Web Title: Accused of hurting religious feelings, the video went viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.