Join us

बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपींना जमीन मिळता कामा नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2021 4:07 AM

लोकमत न्यूज नेटवर्कपेण : चिमुरड्या मुलीवर बलात्कार करून तिची झालेली हत्या मानवतेला कलंक असणारी घटना आहे. त्याचा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पेण : चिमुरड्या मुलीवर बलात्कार करून तिची झालेली हत्या मानवतेला कलंक असणारी घटना आहे. त्याचा तीव्र निषेध करीत आहोत. या गुन्ह्यातील आरोपी हा या आधी बलात्काराच्या गुन्ह्यात शिक्षा झालेला आरोपी असून, तो जामिनावर सुटल्यानंतर पुन्हा त्याने हा गुन्हा केला. त्यामुळे बलात्काराच्या गुन्ह्यात आरोपीला जमीन मिळता कामा नये, तसेच या प्रकरणी जलदगती न्यायालयात खटला चालवून आरोपीला फाशीची शिक्षा करावी, यासाठी गृहमंत्र्यांना पत्र पाठविणार असल्याचे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी केले.

रायगड जिल्ह्यातील पेण शहरातील आदिवासी पाड्यात राहणाऱ्या अवघ्या तीन वर्षांच्या कोवळ्या चिमुरड्या मुलीची बलात्कार करून हत्या करण्यात आल्याची अमानुष घटना घडली. त्या मुलीच्या कुटुंबीयांची आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी सांत्वनपर भेट घेतली. या बळीत मुलीच्या कुटुंबीयांना ॲट्रोसिटी कायद्याच्या तरतुदीनुसार त्वरित आठ लाखांची मदत शासनाने द्यावी, मुलीच्या वडिलांना शासकीय नोकरी द्यावी, तसेच या कुटुंबीयांना प्रधानमंत्री आवास योजनेतून घर द्यावे, असे निर्देश रामदास आठवले यांनी यावेळी प्रशासनाला दिले.

बलात्कार गुन्ह्यातील पीडितेला मनोधैर्य योजनेतून आर्थिक मदत दिली जाते. त्याची रक्कम राज्य शासनातर्फे अनेक प्रकरणांत दिली जात नसून, त्याबाबत गृहमंत्री अनिल देशमुख यांना पत्र पाठविणार असल्याचे रामदास आठवले यांनी सांगितले. यावेळी त्यांनी आदिवासी गावठाणभोवती संरक्षक भिंत बांधण्याची सूचना प्रशासनाला केली. या प्रकल्पाची माहिती दिली होती. यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील, रिपाइंचे रायगड जिल्हा अध्यक्ष तथा पनवेल महानगर पालिका उपमहापौर जगदीश गायकवाड, हेमंत रणपिसे, नरेंद्र गायकवाड, धर्मानंद गायकवाड, घनश्याम चिरणकर आदी उपस्थित होते.

फोटो आहे - ०१ रामदास आठवले या नावाने मेल करत आहे.