मुंबई : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळात कोट्यवधी रुपयांचे घोटाळे करणारे आरोपी मोकाटच आहेत. सीआयडी आणि पोलीस यंत्रणा त्यांच्या मागावर असली तरी ते पकडले जाऊ शकले नाहीत. या महामंडळाचे निवृत्त व्यवस्थापकीय संचालक संतोष इंगळे, निलंबित व्यवस्थापकीय संचालक श्रावण किसन बावणे हे दोन प्रमुख घोटाळेबाज सीआयडीच्या हाती लागत नाहीत. त्यांना अटक झाल्यास अधिक माहिती तपास यंत्रणेला मिळेल.आमदार रमेश कदम आणि इतर सहा जणांविरुद्ध १८ जुलैला दहिसर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते. हे गुन्हे दाखल करतानाच सीआयडीने आरोपींचा ठावठिकाणा आधी माहिती करून त्यांना तत्काळ अटक का केली नाही, असा प्रश्न निर्माण झला आहे. शनिवारी गुन्हा दाखल होऊनही कदम यांनी रविवारी सोलापुरात पत्रपरिषद घेतली तेव्हा पोलीस/सीआयडी काय करीत होते, असा सवालही केला जात आहे.
साठे महामंडळातील आरोपी अद्याप मोकाटच
By admin | Published: July 23, 2015 2:05 AM