बलात्कारातील आरोपीला ‘अ‍ॅट्रॉसिटी’, न्यायालयात पीडितेने केली होती तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 02:44 AM2018-04-20T02:44:33+5:302018-04-20T02:44:33+5:30

बलात्काराचा गुन्हा दाखल होऊन तब्बल सहा महिने उलटल्यानंतर दिंडोशी पोलिसांनी कलमे बदलत आता अ‍ॅट्रॉसिटीअंतर्गत हा गुन्हा दाखल केला आहे. पीडित महिलेने न्यायालयात याबाबत तक्रार केल्यानंतर पोलिसांना ही कारवाई करावी लागली.

The accused was raped by the victim at the 'Atropicity' court | बलात्कारातील आरोपीला ‘अ‍ॅट्रॉसिटी’, न्यायालयात पीडितेने केली होती तक्रार

बलात्कारातील आरोपीला ‘अ‍ॅट्रॉसिटी’, न्यायालयात पीडितेने केली होती तक्रार

Next

मुंबई : बलात्काराचा गुन्हा दाखल होऊन तब्बल सहा महिने उलटल्यानंतर दिंडोशी पोलिसांनी कलमे बदलत आता अ‍ॅट्रॉसिटीअंतर्गत हा गुन्हा दाखल केला आहे. पीडित महिलेने न्यायालयात याबाबत तक्रार केल्यानंतर पोलिसांना ही कारवाई करावी लागली.
तीन मुले असलेली पीडित महिला शैला (बदललेले नाव) ही गेल्या नऊ वर्षांपासून गोरेगाव फिल्म इंडस्ट्रीत हेअर स्टायलिस्ट म्हणून काम करते. पती व्यसनी असल्याने २0१६ पासून ती माहेरी राहते. एका रिअ‍ॅलिटी शोच्या सेटवर आपली आरोपी अतुल कदम याच्याशी ओळख झाली. मेकअपमन असल्याने त्याने आपल्याला अनेक अभिनेत्रींचे हेअर स्टायलिस्ट म्हणून काम दिले. कामाच्या निमित्ताने २७ फेब्रुवारी २0१४ रोजी आरोपीने त्याच्या गोरेगाव (पूर्व) येथील नागरी निवारा परिषदेतील घरी बोलावले आणि शीतपेयात गुंगीचा पदार्थ मिसळून बेशुद्धावस्थेत असताना बलात्कार केला. त्यानंतर मोबाइलमधील अश्लील छायाचित्रे आणि चित्रीकरण दाखवून आरोपीने बळजबरीने शरीरसंबंध ठेवण्यास भाग पाडले. त्याला विरोध केला असता आपली अश्लील छायाचित्रे सासू - सासरे तसेच मित्रमैत्रिणींना पाठवली, अशी महिलेची तक्रार आहे.
३ आॅक्टोबर २0१७ रोजी पोलिसांनी या प्रकरणी कलम ३७६, ६६ (ई) अन्वये गुन्हा दाखल केल्यानंतर आरोपीचा अटकपूर्व जामीनअर्ज दिंडोशी सत्र न्यायालयाने फेटाळून लावला. त्यानंतर आरोपीने उच्च न्यायालयात अर्ज केला. या अर्जावरील सुनावणीच्या वेळी तीन वेळा तपास अधिकारी गैरहजर राहिला.
दरम्यान, पीडित महिला अनुसूचित जातीची असल्याने अ‍ॅट्रॉसिटीअंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात यावा. तसेच भादंविच्या ३२८ कलमाचा समावेश करण्यात यावा, अशी मागणी पीडितेचे वकील अ‍ॅड. तन्वीर निझाम यांनी न्यायालयाकडे केली. त्यानुसार पीडितेचा पुरवणी जबाब नोंदवून कलम ३२८, ४0५, ४१५, ५0६ सह अ‍ॅट्रॉसिटीअंतर्गत कलमे दाखल करण्यात आली. या प्रकरणाचा तपास दुसऱ्या अधिकाºयाकडे सोपवण्यात यावा, अशीही मागणी महिलेने केली आहे.

Web Title: The accused was raped by the victim at the 'Atropicity' court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.