Join us  

मसाजच्या नावाखाली २ वर्षाच्या मुलीचा विनयभंग; पीडितेच्या आईला पाहताच आरोपीने केली शिवीगाळ

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2024 1:44 PM

कांदिवलीत २ वर्षाच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला मुंबई पोलिसांकडून १५ दिवसांनी अटक केली आहे.

Mumbai Crime : बदलापूरच्या एका नामांकित शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचार झाल्याच्या घटनेमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. पोलिसांनी या प्रकरणात शाळेचा सफाई कर्मचारी अक्षय शिंदे याला अटक करण्यात आली. या घटनेनंतर राज्यभरात अत्याचाराच्या घटना उघडकीस येत आहे. अशातच मुंबई पोलिसांनी गुरुवारी एका ३१ वर्षीय व्यक्तीला त्याच्या शेजारच्या दोन वर्षांच्या मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी अटक केली. ही घटना ८ ऑगस्ट रोजी घडली असून याप्रकरणी गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला.

मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार ८ ऑगस्ट रोजी पीडित मुलीची आई घरात तिची दैनंदिन कामे करत होती. मुलगी जागेवर नसल्याने पीडितेची आई तिला शोधत बाहेर गेली. तेव्हा एका सोसायटीत हाऊसकीपिंगचे काम करत असलेल्या आरोपीसोबत सापडली. जेव्हा महिलेने माझ्या मुलीसोबत काय करतोय असा जाब विचारण्यास सुरुवात केली तेव्हा आरोपीने तिला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली आणि नंतर घटनास्थळावरून पळ काढला. तक्रारदार आईने पोलिसांना सांगितले. त्यानंतर शेजारच्या इतर महिलांशी बोलत असताना पीडितेच्या आईला कळलं की आरोपीने शेजारच्या घरात राहणाऱ्या १४ वर्षीय मुलीवरही लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आलं आहे.

पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर समता नगर पोलिसांनी गुरुवारी आरोपी रहीम पठाणला अटक केली. मुलगी घरात नसल्याचे पाहून पीडितेच्या आईने शोधाशोध केली. त्यावेळी २ वर्षाच्या मुलीला आरोपीने स्वतः च्या मांडीवर बसवले होते. आरोपी मसाज करण्याच्या नावाखाली तिच्या पाठीवरून अश्लीलपणे हात फिरवत होता. हा सगळा प्रकार तिच्या आईने पाहिला आणि आरडाओरड केली. त्यावेळी आरोपीने तिला शिवीगाळ करत धमकावले. मुलीची आई घाबरली होती. त्यामुळे तिने लगेच पोलिसांकडे गेली नाही. तिने घरी जाऊन मुलाची तपासणी केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकणानंतर आरोपीने मुलीच्या आईला धमकावले होते. त्यामुळे कुटुंबीयांनी या प्रकरणाची पोलिसात त्वरित तक्रार केली नव्हती. मात्र कसेतरी हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले. त्यानंतर स्थानिक पोलीस ठाण्यातील निर्भया पथकातील एका पोलिस अधिकाऱ्याने पालकांना तक्रार देण्यास सांगितले.

गुरुवारी मुलीच्या पालकांनी पोलिसात जाऊन तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ कारवाई सुरु केली. पोलिसांनी शोध पथक तयार करुन रात्री उशिरा आरोपीला अटक केली, अशी माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी भारतीय न्याय संहिताच्या कलम ६४(१), ७५, ३५२ आणि पोल्को कायद्याच्या ४, ६, ८ आणि १ अंतर्गत आरोपीला अटक करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी शुक्रवारी आरोपीला विशेष पॉक्सो न्यायालयात हजर केले.

टॅग्स :मुंबईगुन्हेगारीमुंबई पोलीस