लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राखीव जागांवर ग्रामपंचायत निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांकडे जातवैधता प्रमाणपत्र नसल्यास पडताळणी समितीकडे हे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी केलेल्या अर्जाची सत्यप्रत, पोचपावती किंवा अर्ज केल्याबाबतचा कोणताही पुरावा सादर करण्याची मुभा आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी दिली.
मदान यांनी सांगितले की, निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी ३० डिसेंबरपर्यंत नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची अंतिम मुदत आहे. राखीव जागांवर नामनिर्देशपत्र दाखल करताना जातवैधता प्रमाणपत्र नसल्यास जातपडताळणी समितीकडे जातवैधता प्रमाणपत्रासाठी केलेल्या अर्जाबाबतचा पुरावा सादर करण्याबरोबरच एक हमीपत्रही देणे आवश्यक राहील. विजयी झाल्याच्या दिनांकापासून एक वर्षाच्या आत पडताळणी समितीने दिलेले जातवैधता प्रमाणपत्र सादर केले जाईल, असे या हमीपत्रात नमूद करावे लागेल.
‘जातवैधता प्रमाणपत्राऐवजी’ ‘जातवैधता प्रमाणपत्र नसल्यास’ असा बदल केला आहे.
...........................