रुग्णालय परिसरात ध्वनिप्रदूषण वाढले

By admin | Published: May 18, 2017 03:40 AM2017-05-18T03:40:13+5:302017-05-18T03:40:13+5:30

मुंबई शहर आणि उपनगरांतील खासगी, सरकारी आणि महापालिका रुग्णालय परिसरातील ध्वनिप्रदूषणाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच असून, आवाज फाउंडेशनने केलेल्या सर्व्हेनुसार

Acoustic pollution increased in the hospital premises | रुग्णालय परिसरात ध्वनिप्रदूषण वाढले

रुग्णालय परिसरात ध्वनिप्रदूषण वाढले

Next

- लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरांतील खासगी, सरकारी आणि महापालिका रुग्णालय परिसरातील ध्वनिप्रदूषणाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच असून, आवाज फाउंडेशनने केलेल्या सर्व्हेनुसार हिंदुजा आणि केईएम रुग्णालय परिसरात तब्बल १०० डेसिबल आवाजाची नोंद झाली आहे. महत्त्वाचे म्हणजे रुग्णालय परिसर ‘शांतता क्षेत्र’ असूनही, येथे ध्वनिप्रदूषणाचे नियम धाब्यावर बसवले जात आहेत. परिणामी, यासंबंधी ठोस कारवाई करावी, अशी मागणी आवाज फाउंडेशनने केली आहे.
आवाज फाउंडेशन सातत्याने मुंबई शहर आणि उपनगरांतील आवाजाच्या नोंदी घेत असून, उत्सवांसह वाहनांच्या आवाजाच्या नोंदी यापूर्वी घेण्यात आल्या आहेत. महत्त्वाचे म्हणजे, लोकलच्या भोंग्यांचा आवाज नोंदवत त्याचे डेसिबल कमी करण्यासाठी रेल्वेमंत्र्यांसोबत पत्रव्यवहार करण्यात आला आहे. आता आवाजने मुंबईतील रुग्णालय परिसरातील ध्वनिप्रदूषणाची नोंद घेतली आहे. नोंदीनुसार, हिंदुजा आणि केईम रुग्णालयाबाहेर अधिक ध्वनिप्रदूषण होत असल्याचे आवाजच्या सर्वेसर्वा सुमेरा अब्दुल अली यांनी सांगितले.

- रुग्णालयाबाहेरील वाहतुकीमुळे ध्वनिप्रदूषणात वाढ होत असल्याचे आवाजने म्हटले आहे. विशेषत: वाहनांच्या भोंग्यांमुळे ध्वनिप्रदूषणाचे प्रमाण वाढतच असून, याकडे लक्ष देण्यात यावे, असे आवाजने म्हटले आहे. दरम्यान, मुंबईतील रुग्णालयाबाहेरील आवाजाची तुलना लंडनमधील रुग्णालयाबाहेरील आवाजाशी करण्यात आली आहे.

मुंबई...
रुग्णालयआवाज (डेसिबल)
होली फॅमिली९७.४
लिलावती९५.१
सायन९७.३
केईएम१००.३
वाडिया९९.६
हिंदुजा१००.५

लंडन...
रुग्णालयआवाज
यूसीएच६२
सेंट मेरी७९
सेंट थॉमस८१
रॉयल लंडन८२
लंडन क्लिनिक७६
रस्त्यावरील रुग्णवाहिका९४

Web Title: Acoustic pollution increased in the hospital premises

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.