Join us

रुग्णालय परिसरात ध्वनिप्रदूषण वाढले

By admin | Published: May 18, 2017 3:40 AM

मुंबई शहर आणि उपनगरांतील खासगी, सरकारी आणि महापालिका रुग्णालय परिसरातील ध्वनिप्रदूषणाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच असून, आवाज फाउंडेशनने केलेल्या सर्व्हेनुसार

- लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरांतील खासगी, सरकारी आणि महापालिका रुग्णालय परिसरातील ध्वनिप्रदूषणाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच असून, आवाज फाउंडेशनने केलेल्या सर्व्हेनुसार हिंदुजा आणि केईएम रुग्णालय परिसरात तब्बल १०० डेसिबल आवाजाची नोंद झाली आहे. महत्त्वाचे म्हणजे रुग्णालय परिसर ‘शांतता क्षेत्र’ असूनही, येथे ध्वनिप्रदूषणाचे नियम धाब्यावर बसवले जात आहेत. परिणामी, यासंबंधी ठोस कारवाई करावी, अशी मागणी आवाज फाउंडेशनने केली आहे.आवाज फाउंडेशन सातत्याने मुंबई शहर आणि उपनगरांतील आवाजाच्या नोंदी घेत असून, उत्सवांसह वाहनांच्या आवाजाच्या नोंदी यापूर्वी घेण्यात आल्या आहेत. महत्त्वाचे म्हणजे, लोकलच्या भोंग्यांचा आवाज नोंदवत त्याचे डेसिबल कमी करण्यासाठी रेल्वेमंत्र्यांसोबत पत्रव्यवहार करण्यात आला आहे. आता आवाजने मुंबईतील रुग्णालय परिसरातील ध्वनिप्रदूषणाची नोंद घेतली आहे. नोंदीनुसार, हिंदुजा आणि केईम रुग्णालयाबाहेर अधिक ध्वनिप्रदूषण होत असल्याचे आवाजच्या सर्वेसर्वा सुमेरा अब्दुल अली यांनी सांगितले.- रुग्णालयाबाहेरील वाहतुकीमुळे ध्वनिप्रदूषणात वाढ होत असल्याचे आवाजने म्हटले आहे. विशेषत: वाहनांच्या भोंग्यांमुळे ध्वनिप्रदूषणाचे प्रमाण वाढतच असून, याकडे लक्ष देण्यात यावे, असे आवाजने म्हटले आहे. दरम्यान, मुंबईतील रुग्णालयाबाहेरील आवाजाची तुलना लंडनमधील रुग्णालयाबाहेरील आवाजाशी करण्यात आली आहे.मुंबई...रुग्णालयआवाज (डेसिबल)होली फॅमिली९७.४लिलावती९५.१सायन९७.३केईएम१००.३वाडिया९९.६हिंदुजा१००.५लंडन...रुग्णालयआवाज यूसीएच६२सेंट मेरी७९सेंट थॉमस८१रॉयल लंडन८२लंडन क्लिनिक७६रस्त्यावरील रुग्णवाहिका९४