सहा भूखंड ताब्यात घेण्यावरून सेनेविरुद्ध भाजपा-विरोधकांची एकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2019 01:51 AM2019-01-14T01:51:17+5:302019-01-14T01:51:35+5:30

अधिकाऱ्यांनी दिली अर्धवट माहिती : शिवसेनेचा आरोप; प्रस्ताव दफ्तरी ठेवण्यावरून वाद

On the acquisition of six plots, the unity of the BJP-opposition against Sena | सहा भूखंड ताब्यात घेण्यावरून सेनेविरुद्ध भाजपा-विरोधकांची एकी

सहा भूखंड ताब्यात घेण्यावरून सेनेविरुद्ध भाजपा-विरोधकांची एकी

Next

मुंबई : अतिक्रमण झाले असल्यामुळे सहा भूखंड ताब्यात घेण्याचा प्रस्ताव फेटाळणाºया शिवसेनेला विरोधकांनी आव्हान दिले आहे़ मात्र, या भूखंडांचे मालक एकच असल्याने अर्धवट माहिती देऊन या जागा विकासकाच्या घशात घालण्याचा पालिका अधिकाºयांचा घाट आहे, असा आरोप करीत सत्ताधाºयांनी विरोधकांकडेही बोट दाखविले आहे़ त्यामुळे सहा भूखंड ताब्यात घेण्यावरून वाद पेटला आहे़ दुसरीकडे भूखंड ताब्यात घेण्याचा प्रस्ताव दप्तरी दाखल करण्यात आल्याने विरोधक तापले़


या चर्चेत भाजपानेही उडी घेऊन शिवसेनेला कोंडीत पकडले आहे़ त्यामुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भूखंडांचे प्रकरण पहारेकºयांसाठी शिवसेनेविरोधात आयते कोलीत ठरणार आहे़


पश्चिम उपनगरातील सहा आरक्षित भूखंड ताब्यात घेण्याचा प्रस्ताव सुधार समितीच्या बैठकीत शिवसेनेने दप्तरी दाखल केला़ याचे तीव्र पडसाद सर्वत्र उमटून विरोधकांनी सत्ताधारी शिवसेनेला कोंडीत पकडले़ महासभेच्या बैठकीत विरोधकांनी श्रीखंड भेट देऊन शिवसेनेला खिजविले़ यामुळे शिवसेनेमध्ये तीव्र नाराजी उमटून स्थायी समितीच्या गेल्या बैठकीत विरोधकांना बेस्ट संपावर सभा तहकुबी सत्ताधाºयांनी मांडू दिली नाही़


दरम्यान, सुधार समितीत सहा भूखंडांच्या प्रस्तावावर चर्चा सुरू असताना गप्प बसलेल्या तीन स्वपक्षीय नगरसेवकांना काँग्रेसने कारणे दाखवा नोटीस बजावली होती़ मात्र, दुसºया दिवशी ही नोटीस मागे घेण्यात आल्याने शिवसेनेने विरोधी पक्षाच्या भूमिकेवरच संशय घेत, काँग्रेसची विकासकाशी सेटिंग तर नाही? असा टोला स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी लगावला आहे़ या सहा भूखंडांवर सविस्तर अहवाल मागविण्यात आला असून, त्यांनतरच यावर निर्णय होईल, असे त्यांनी सांगितले़


काँग्रेसची विकासकाशी सेटिंग?
शिवसेनेने विरोधी पक्षाच्या भूमिकेवरच संशय घेत, काँग्रेसची विकासकाशी सेटिंग तर नाही? असा टोला स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी लगावला आहे़ या सहा भूखंडांवर सविस्तर अहवाल मागविण्यात आला असून, त्यांनतरच यावर निर्णय होईल, असे त्यांनी सांगितले़ याआधीही विरोधकांनी शिवसेनेवर अशाच प्रकारे आरोप केले होते़

Web Title: On the acquisition of six plots, the unity of the BJP-opposition against Sena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.