सीआयएसएफ जवानांसाठी अभिनयाचे विनामूल्य वर्कशॉप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2018 02:49 AM2018-07-20T02:49:25+5:302018-07-20T02:49:29+5:30

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (सीआयएसएफ) व निमलष्करी दलांच्या कामगिरीवर चांगली कथा मिळाल्यास त्यावर चित्रपट काढण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही ज्येष्ठ अभिनेते, फिल्म अ‍ॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आॅफ इंडियाचे अध्यक्ष अनुपम खेर यांनी दिली.

Acting Free Workshop for CISF jawans | सीआयएसएफ जवानांसाठी अभिनयाचे विनामूल्य वर्कशॉप

सीआयएसएफ जवानांसाठी अभिनयाचे विनामूल्य वर्कशॉप

Next

मुंबई : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (सीआयएसएफ) व निमलष्करी दलांच्या कामगिरीवर चांगली कथा मिळाल्यास त्यावर चित्रपट काढण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही ज्येष्ठ अभिनेते, फिल्म अ‍ॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आॅफ इंडियाचे अध्यक्ष अनुपम खेर यांनी दिली. सीआयएसएफला ५० वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने गुरुवारी चेंबूर येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. सीआयएसएफमधील इच्छुकांसाठी अभिनयाचे विनामूल्य वर्कशॉप घेण्याची तयारीही त्यांनी दर्शवली.
चेंबूर येथील आरसीएफ कॉलनीतील देशमुख सभागृहात रंगलेल्या या कार्यक्रमात खेर यांनी आपल्या खुमासदार भाषणाने उपस्थितांची मने जिंकत त्यांना मनमुराद हसवले. या वेळी सीआयएसएफचे पश्चिम विभागाचे महानिरीक्षक सतीश खंदारे, उप महानिरीक्षक संजय कुमार उपस्थित होते.
सीआयएसएफच्या कार्यक्रमाला आल्यावर विमानतळावरील तपासणीप्रमाणे त्यांच्यासमोर दोन्ही हात बाजूला करून उभे राहण्याचे मनात होते. विमानतळावर जेव्हा तपासणी केली जाते त्या वेळी त्या जवानांची गळाभेट घेण्याची इच्छा होते, असे खेर म्हणाले. शिमल्यासारख्या शहरातून मुंबईत आल्यावर काही दिवस वांद्रे रेल्वे स्थानकावर झोपावे लागले होते. मात्र, कठोर परिश्रम व आईवडिलांच्या आशीर्वादामुळे आजवर यश मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
जीवनात समाधानी व आनंदी राहण्यासाठी दुसऱ्यांवर अवलंबून राहू नये, स्वत:च्या आनंदाची किल्ली दुसºयाच्या हातात देऊ नये, त्याचे नियंत्रण स्वत:कडेच ठेवावे, असा सल्लाही त्यांनी दिला. स्वत:च्या क्षमतेवर नेहमी विश्वास ठेवण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. कितीही विदारक परिस्थिती आली तरी स्वप्ने पाहणे सुरूच ठेवावे, मनातील भीतीला दूर सारून पुढे जाण्याचे प्रयत्न करावेत. ‘भारतमाता की जय!’ म्हणयाची काही जणांना लाज वाटते. पण देशात राहणाºयांना ‘भारतमाता की जय!’ म्हाणावेच लागेल, असा सूचक इशाराही त्यांनी दिला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक वरिष्ठ कमांडर क्षिप्रा श्रीवास्तव यांनी केले तर मोहम्मद हनीफ यांनी आभार मानले. अमित जे यांनी सूत्रसंचालन केले.

वर्दीआड हाडामासाचा माणूस
वर्दीआड हाडामासाचा माणूस आहे याची जाणीव सर्वसामान्यांना होण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. कंटाळा न केल्यास यश मिळते. निम्न मध्यमवर्गातून आल्याने ते संस्कार व विचार अद्याप कायम आहेत. गरिबीतही समाधानाची एक वेगळीच श्रीमंती असते, असे अनुमप खेर यांनी सांगितले.

>सीआयएसएफच्या अधिकारी, जवानांना प्रोत्साहित करण्यासाठी गुरुवारी अनुपम खेर यांचे व्याख्यान आयोजित केले होते. खेर यांनी हसतखेळत जवानांमध्ये जाऊन त्यांच्याशी संवाद साधला. तसेच त्यांच्यासोबत सेल्फी काढला.

>सीआयएसएफमध्ये दीड लाखांपेक्षा जास्त जवान व अधिकारी कार्यरत आहेत. देशातील ३४०पेक्षा जास्त महत्त्वपूर्ण ठिकाणांच्या सुरक्षेची जबाबदारी त्यांच्याकडे आहे.

Web Title: Acting Free Workshop for CISF jawans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.