१ लाख फेरीवाल्यांवर कारवाई

By admin | Published: October 25, 2015 01:49 AM2015-10-25T01:49:45+5:302015-10-25T01:49:45+5:30

मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी मुंबई महापालिकेला अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले असले, तरी यापूर्वीच प्रशासनाने अनधिकृत फेरीवाल्यांवरील कारवाईची

Action on 1 lakh hawkers | १ लाख फेरीवाल्यांवर कारवाई

१ लाख फेरीवाल्यांवर कारवाई

Next

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी मुंबई महापालिकेला अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले असले, तरी यापूर्वीच प्रशासनाने अनधिकृत फेरीवाल्यांवरील कारवाईची धडक मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार, मागील नऊ महिन्यांपासून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई सुरू असल्याचे प्रशासनाने शनिवारी स्पष्ट केले आहे. मोहिमेंतर्गत तब्बल १ लाखांपेक्षा अधिक फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आली आहे. कारवाईनंतर ठोठावण्यात आलेल्या दंडासह लिलावाद्वारे महापालिकेला १ कोटी ६० लाख रुपयांची रक्कम प्राप्त झाली आहे.
महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त डॉ. पल्लवी दराडे यांच्या निर्देशानुसार, उपायुक्त बापू पवार यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिका क्षेत्रातील सर्व प्रशासकीय विभागांत अनधिकृत फेरीवाल्यांवर नियमित स्वरूपात धडक कारवाई सुरू आहे, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. या अंतर्गत संपूर्ण महापालिका क्षेत्रामध्ये १ जानेवारी ते ३० सप्टेंबर या ९ महिन्यांच्या कालावधीत एकूण १ लाख ३ हजार ९९५ एवढ्या अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आली आहे. यातून १ कोटी ३६ लाख ४४ हजार २६८ रुपये इतकी रक्कम दंड स्वरूपात, तर दावा न केलेल्या मालाच्या लिलावातून २४ लाख २९ हजार ६७८ इतकी रक्कम प्राप्त झाली आहे. त्यानुसार, महापालिकेला १ कोटी ६० लाख ७३ हजार ९४६ रुपये इतकी एकूण रक्कम प्राप्त झाली आहे. (प्रतिनिधी)

महापालिका क्षेत्रातील सर्व परिसरात व विशेषकरून रेल्वे स्थानक परिसरात विशेष मोहीम सातत्याने राबविण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार, महापालिकेच्या सर्व २४ विभागांत अनधिकृत फेरीवाल्यांवर
नियमित स्वरूपात कारवाई करण्यात येत आहे.

१ जानेवारी ते ३० सप्टेंबर या कालावधीत १ लाख ३ हजार
९९५ अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आली. मे महिन्यापासून अनधिकृत फेरीवाल्यांवरील कारवाईची तीव्रता वाढविण्यात आली आहे.


महिनाफेरीवालेदंड/लिलाव
जानेवारी८३२५१४२२२८
फेब्रुवारी६७३८१२००८२८
मार्च६१७२११५५०००
एप्रिल५६४९३१७५४६३
मे११९१६१३८२९८७
जून१६४५२१३४४१९७
जुलै१५८९११५२७४२१
आॅगस्ट१६६८०४५१२३४२
सप्टेंबर१६१७२३५३४२७
एकूण१०३९९५१६०७३९४६
(एकूण रक्कम रुपयांत)

Web Title: Action on 1 lakh hawkers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.