६ महिन्यांत १ लाख फेरीवाल्यांवर कारवाई

By admin | Published: October 13, 2016 04:22 AM2016-10-13T04:22:58+5:302016-10-13T04:22:58+5:30

आयुक्त अजय मेहता यांच्या आदेशान्वये अनधिकृत फेरीवाले, अनधिकृत खाद्यपदार्थ विक्रेत्यांविरोधात महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन खात्याद्वारे

Action on 1 lakh hawkers in 6 months | ६ महिन्यांत १ लाख फेरीवाल्यांवर कारवाई

६ महिन्यांत १ लाख फेरीवाल्यांवर कारवाई

Next

मुंबई : आयुक्त अजय मेहता यांच्या आदेशान्वये अनधिकृत फेरीवाले, अनधिकृत खाद्यपदार्थ विक्रेत्यांविरोधात महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन खात्याद्वारे कारवाई केली जात आहे. १ एप्रिल ते ३० सप्टेंबर या सहा महिन्यांच्या कालावधीत १ लाख १२ हजार ६५१ अनधिकृत विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईद्वारे सुमारे ३० कोटी ५९ लाख ३३ हजार ५०१ रुपयांचा माल जप्त करण्यात आला. कारवाईपोटी २ कोटी ३ लाख ५५ हजार ३४४ रुपयांचा दंड महापालिकेच्या तिजोरीत जमा झाला आहे, असे माहिती उपायुक्त मिलिन सावंत यांनी सांगितले.
सकाळ व सायंकाळ अशा दोन्ही सत्रांत ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईदरम्यान ५ हजार १६० हातगाड्या, १ हजार ४४ सिलिंडर्स, ५७ टेबल स्टॉल्स व २४ उसाचे चरक जप्त करण्यात आले. ३५ हजार ९२८ नाशवंत पदार्थ विक्रेते, ५० हजार ३६६ अनाशवंत पदार्थ विक्रेते, २०
हजार ७२ अनधिकृत खाद्यपदार्थ विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली आहे.
‘जी/उत्तर’ विभागात सर्वाधिक म्हणजे १३ हजार १७३ अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आली. त्याखालोखाल ‘ए’ विभागात ८ हजार ५६, तर ‘आर/मध्य’ विभागात ६ हजार २४८ अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आली. त्याचबरोबर सर्वाधिक दंडवसुली ही ‘एच/पश्चिम’ विभागातून २६ लाख १९ हजार ५७७ रुपये एवढी करण्यात आली, तर त्याखालोखाल ‘एल’ विभागातून १२ लाख ६३ हजार ५७४ रुपये, ‘आर/दक्षिण’ विभागातून १० लाख ५० हजार ४६९ रुपये, तर ‘आर/मध्य’ विभागातून १० लाख २१ हजार ७६७ रुपये एवढी रक्कम वसूल करण्यात आली. (प्रतिनिधी)

Web Title: Action on 1 lakh hawkers in 6 months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.