१४ पान टप-यांवर कारवाई

By admin | Published: February 25, 2015 03:50 AM2015-02-25T03:50:35+5:302015-02-25T03:50:35+5:30

शाळेच्या आवारात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या १४ दुकानांवर महापालिकेच्या पी उत्तर विभागाकडून धडक कारवाई करण्यात आली.

Action on 14 page breaks | १४ पान टप-यांवर कारवाई

१४ पान टप-यांवर कारवाई

Next

मुंबई : शाळेच्या आवारात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या १४ दुकानांवर महापालिकेच्या पी उत्तर विभागाकडून धडक कारवाई करण्यात आली. ‘लोकमत’ने केलेल्या रिअ‍ॅलिटी चेकच्या पार्श्वभूमीवर पालिकेने ही कारवाई केली आहे.
शाळा परिसरापासून किमान शंभर फूट अंतरावर तंबाखूजन्य पदार्थांवर बंदी असूनसुद्धा या ठिकाणी राजरोसपणे हे पदार्थ कशाप्रकारे विकले जातात, त्याचा पर्दाफाश ‘लोकमत’ने केला. त्यानंतर खडबडून जाग येत प्रशासनाने या पानटपऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला. त्याचाच एक भाग म्हणजे पालिकेच्या पी उत्तर विभागाकडून मालाड पूर्व आणि पश्चिम परिसरात असलेल्या शाळांजवळ तंबाखूजन्य पदार्थांची विक्र ी करणाऱ्या दुकानांवर धाड टाकून या दुकानांमधील गुटखा, पानमसाला, सिगारेट्स, विडीची बंडले हस्तगत केली. पी उत्तर विभागाचे साहाय्यक आयुक्त देवेंद्रकुमार जैन यांच्या नेतृत्वाखाली मालाड पूर्व परिसरातील कुरार, राणी सती मार्ग, दफ्तरी मार्ग, आप्पा पाडा, ए.के. वैद्य मार्ग, अथर्व महाविद्यालय, मार्वे रोड या परिसरात सोमवारपासून कारवाई करण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या दोन दिवसांत आम्ही केलेल्या कारवाईत एकूण १४ दुकानांवर धाड टाकून त्यांच्याकडून जवळपास ४५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. आमच्या अतिक्र मण निर्मूलन फेरीवाला या विभागाने ही कारवाई केल्याची माहिती जैन यांनी दिली. (प्रतिनिधी)

Web Title: Action on 14 page breaks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.