मुंबई : मुंबईत अनधिकृत स्कूल व्हॅन व बसेसवर प्रादेशिक परिवहन विभागाकडून (आरटीओ) सात महिन्यांत स्कूलबससह ३२० इतर विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात आली. या प्रकरणी ५,६५,९०० रुपयांची दंडवसुली करण्यात आली आहे, तर २४ वाहने जप्त करण्यात आली आहेत.आरटीओकडून राज्यात स्कूलबस तपासणी मोहीम राबविली जात आहे. या अंतर्गत मुंबईत विद्यार्थी वाहतूक करणाºया ३४२६ वाहनांची तपासणी करण्यात आली. यामध्ये १८२४ स्कूलबस आणि १६०४ इतर वाहनांचा समावेश आहे. यामध्ये ३२० वाहने दोषी आढळली असून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. या कारवाईत ५,६५,९०० रुपयांची दंडवसुली करण्यात आली आहे, अशी माहिती आरटीओ विभागाच्या वतीने देण्यात आली. या मोहिमेंतर्गत विद्यार्थ्यांची वाहतूक करणाºया दुचाकीसह, स्कूलबस, रिक्षा, स्कूल व्हॅन यांची तपासणी करण्यात आली. तसेच क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक आणि चालक, सहप्रवासी, विद्यार्थी यांनी हेल्मेट परिधान न करणे, भाडे नाकारणे आदी कारणांसाठी कारवाई करण्यात आली.वडाळ्यात तीन लाखांचा दंड वसूलवडाळा विभागात १५६९ वाहनांची तपासणी करण्यात आली. यामध्ये १२० वाहने दोषी आढळली. या वाहनचालकांकडून ३,०५,००० रुपयांची दंडवसुली करण्यात आली आहे.>विभाग तपासलेली दोषी दंडवसुलीवाहने वाहनेताडदेव १३८ ५४ १५००००अंधेरी ४४६ ८६ ६०९००वडाळा १५६९ १२० ३०५०००बोरीवली १२७३ ६० ५००००एकूण ३४२६ ३२० ५६५९००
स्कूलबससह ३२० वाहनांवर कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: January 07, 2020 5:37 AM