गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या साडेदहा हजार जणांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2019 06:03 AM2019-09-16T06:03:49+5:302019-09-16T06:03:54+5:30

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता येत्या दोन दिवसांमध्ये लागू होण्याची शक्यता आहे.

Action against 1,500 people with criminal backgrounds | गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या साडेदहा हजार जणांवर कारवाई

गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या साडेदहा हजार जणांवर कारवाई

Next

मुंबई : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता येत्या दोन दिवसांमध्ये लागू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे निवडणुकीच्या काळात मुंबई शहर आणि उपनगरात शांतता व सुव्यवस्था कायम राहावी, यासाठी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या तब्बल साडेदहा हजार जणांवर विविध प्रकारे प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे, तर काही जणांना तडीपारच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
शहर व उपनगरात एकूण ३६ विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. प्रत्येक मतदारसंघनिहाय निवडणुकीच्या दृष्टीने आवश्यक तयारी करण्यात आलेली आहे. त्यासाठी उपायुक्त व अप्पर आयुक्तांकडून बंदोबस्त व सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यात येत आहे. प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तडीपार, खून, मारामारी, संघटित गुन्हे आदी प्रकारांत सहभागी असलेल्या गुन्हेगारांची यादी बनविली आहे. त्यांच्यावरील गुन्ह्याच्या स्वरूपाप्रमाणे संबंधितांवर कारवाई केल्याचे आयुक्त संजय बर्वे यांनी सांगितले.
>सोशल ‘वॉच’
ंजवळपास साडेदहा हजार जणांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. निवडणुकीच्या काळात आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याची सूचना अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत. त्याचप्रमाणे, शांततेचा भंग करणारे, सोशल मीडियाद्वारे अफवा पसरविणाºयावरही कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे.

Web Title: Action against 1,500 people with criminal backgrounds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.