नाकाबंदीत तीन हजार बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 04:07 AM2021-02-15T04:07:12+5:302021-02-15T04:07:12+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मुंबई पोलिसांनी शनिवारी मध्यरात्री नाकाबंदी राबवून तब्बल ११ हजार ८८१ वाहनांची तपासणी केली. त्यातील ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई पोलिसांनी शनिवारी मध्यरात्री नाकाबंदी राबवून तब्बल ११ हजार ८८१ वाहनांची तपासणी केली. त्यातील बेशिस्त व नियमबाह्यपणे गाडी चालविणाऱ्या ३,१४१ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. ‘ऑपरेशन ऑल आऊट’अंतर्गत ही कारवाई करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
शनिवारी रात्री ११ ते मध्यरात्री २ या कालावधीत शहर व उपनगरातील प्रमुख मार्गांवर नाकाबंदी लावली होती. त्यामध्ये एकूण ११ हजार ८८१ वाहने तपासण्यात आली. त्यामध्ये ‘ड्रंक अँड ड्राइव्ह’अंतर्गत ३१ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले, तर विनापरवाना व भरधाव गाडी चालविल्याबद्दल ३,१४१ वाहनचालकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले.
------
५० भिकारी ताब्यात
‘ऑल आऊट’ मोहिमेंतर्गत रस्त्यावर वाहने अडवून भीक मागणाऱ्या ५० जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्यामुळे वाहनधारकांना त्रास होऊन वाहतुकीची कोंडी निर्माण होत असल्याने ही कारवाई करण्यात आली. संबंधितांची मुलंड येथील भिक्षागृहात रवानगी करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले. त्याशिवाय
महाराष्ट्र पोलीस कलम १२० व १२२ अन्वये एकूण ९० जणांवर, तर १३५ अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आली आहे.