Join us

विना मास्क फिरणाऱ्या ३,८०६ नागरिकांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 4:06 AM

मुंबई - विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांना गेल्या दीड वर्षांपासून दंड ठोठावण्यात येत आहे. तरीही दररोज सरासरी साडेतीन हजार नागरिक ...

मुंबई - विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांना गेल्या दीड वर्षांपासून दंड ठोठावण्यात येत आहे. तरीही दररोज सरासरी साडेतीन हजार नागरिक विना मास्क फिरताना पकडले जात आहेत. कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने नागरिकही मास्क लावण्याबाबत बेफिकीर होत असल्याचे आढळून आले आहे. दिवसभरात अशा ३,८०६ लोकांकडून सात लाख ६१ हजार २०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

कोरोनाचा मुंबईत शिरकाव झाल्यानंतर मास्क लावणे अनिवार्य करण्यात आले. या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या लोकांवर दंडात्मक कारवाई करण्यास पालिका प्रशासनाने सुरुवात केली. आतापर्यंत पालिका आणि पोलिसांमार्फत २९ लाख ७१ हजार ६९५ लोकांवर कारवाई करून ५९ कोटी ८२ लाख ४२ हजार २०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. मात्र गेल्या काही दिवसामध्ये कोरोनाचा संसर्ग पूर्णपणे नियंत्रणात आल्यानंतर विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांचे प्रमाण वाढले असल्याचे दिसून येत आहे.

फेब्रुवारी महिन्यात कोरोनाची दुसरी लाट सुरू झाल्यानंतर महापालिकेने विना मास्क फिरणाऱ्यांवरील कारवाई तीव्र केली. यासाठी क्लीन अप मार्शल्सची संख्याही वाढविण्यात आली. पालिकेचे क्लीन अप मार्शल व पोलीस आणि रेल्वे हद्दीतही कारवाई सुरू आहे. मात्र रुग्णसंख्येत घट होताच कारवाईचे प्रमाणही थंडावले असल्याचे दिसून येत आहे.

एप्रिल २०२० ते ८ जुलै २०२१

(नागरिक)....आतापर्यंत दंड

२५५१०१६...५१३८४५४०० (महापालिकेमार्फत कारवाई)

३९६७८८....७९३५७६०० (मुंबई पोलिसांमार्फत कारवाई)

* एप्रिल २०२० ते ८ जुलै २०२१ पर्यंत...२९ लाख दोन हजार ७१ हजार ६९५ लोकांवर कारवाई करून ५९ कोटी ८२ लाख ४२ हजार २०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

* गेल्या दहा महिन्यांच्या कालावधीत रस्त्यावर थुंकणाऱ्या १६ हजार ४९० लोकांना प्रत्येकी दोनशे रुपये दंड करून ३२ लाख ६८ हजार १०० रुपये वसूल करण्यात आले आहे.