थकबाकीदारांवर कारवाईचा बडगा; ८२ कोटींच्या मालमत्ता कर वसुलीचे लक्ष्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2019 04:37 AM2019-03-27T04:37:49+5:302019-03-27T04:37:56+5:30

आर्थिक वर्ष संपण्यास जेमतेम पाच दिवस उरले असताना मालमत्ता कराचे लक्ष्य अद्याप महापालिकेला गाठता आलेले नाही. त्यामुळे थकबाकीदारांवरील कारवाई तीव्र करण्यात आली आहे.

 Action against the defaulters; Target of property tax recovery of Rs 82 crores | थकबाकीदारांवर कारवाईचा बडगा; ८२ कोटींच्या मालमत्ता कर वसुलीचे लक्ष्य

थकबाकीदारांवर कारवाईचा बडगा; ८२ कोटींच्या मालमत्ता कर वसुलीचे लक्ष्य

Next

मुंबई : आर्थिक वर्ष संपण्यास जेमतेम पाच दिवस उरले असताना मालमत्ता कराचे लक्ष्य अद्याप महापालिकेला गाठता आलेले नाही. त्यामुळे थकबाकीदारांवरील कारवाई तीव्र करण्यात आली आहे. आतापर्यंत २७ मालमत्तांवर कारवाई करण्यात आली आहे. यापैकी पाच मालमत्तांचा लिलाव लवकरच करण्यात येणार आहे. त्याचबरोबर जलजोडणी
खंडित करणे, जप्ती अशा स्वरूपात
८२ कोटी रुपये वसूल
करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
जकात कर बंद झाल्यानंतर मालमत्ता कर हे उत्पन्नाचे प्रमुख स्रोत बनले आहे. मात्र बांधकाम क्षेत्रात असलेल्या मंदीचा फटका या करातून मिळणाऱ्या उत्पन्नाला बसला. त्यामुळे ५२०६ कोटी रुपयांचे लक्ष्य महापालिकेला अद्याप गाठता आलेले नाही. याचा परिणाम विकासकामांवर होणार असल्याने महापालिकेने मालमत्ता कराची थकबाकी वसूल करण्यासाठी जोर लावला आहे. विशेष म्हणजे मालमत्ता कराची थकबाकी तब्बल पाच हजार कोटी रुपये आहे.
वारंवार नोटीस पाठवूनही
यापैकी असंख्य थकबाकीदार
थकीत रक्कम भरत नसल्यामुळे महापालिकेने कारवाईचा बडगा दाखविण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये निवासी, वाणिज्यिक, औद्योगिक, खुली जागा, शासकीय, शैक्षणिक थकबाकीदार मालमत्तांचा समावेश आहे. थकबाकीदारांच्या पहिल्या यादीत काही बड्या विकासक व कंपनींचा समावेश होता. या नोटीसला प्रतिसाद मिळून काही थकबाकीदार तत्काळ रक्कम भरत आहेत. त्यामुळे अन्य थकबाकीदारांनाही पालिकेने कारवाईचा धाक दाखविला आहे.

१३ मालमत्तांच्या जप्तीची कारवाई
ग्रँट रोड दोन, दक्षिण मध्य मुंबई एक, वांद्रे पूर्व दोन, अंधेरी पूर्व दोन, गोरेगाव एक, बोरीवली तीन आणि भांडुपमधील दोन मालमत्तांवर जप्ती व अटकावणीची कारवाई करण्यात आली आहे. या १३ मालमत्तांची एकूण ३७ कोटी ३८ लाख रुपये थकबाकी आहे.

पाच मालमत्तांचा जाहीर लिलाव
एकूण थकबाकी - १४ कोटी ६२ लाख, दोन व्यवसायिक इमारती - आठ कोटी, तीन भूखंड - सहा कोटी नऊ मालमत्तांची जलजोडणी खंडित, ग्रँट रोड येथील दोन, दक्षिण मध्य मुंबई आणि वांद्रे येथील प्रत्येकी एक, अंधेरी प. येथील दोन, बोरीवली आणि भांडुप येथे प्रत्येकी एक अशा नऊ मालमत्तांची जलजोडणी खंडित करण्यात आली आहे. या मालमत्तांनी एकूण ३० कोटी ५० लाख थकविले आहेत.

Web Title:  Action against the defaulters; Target of property tax recovery of Rs 82 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई