नोटांची उधळण भोवली; अभिनेत्री माधवी जुवेकरसह कर्मचाऱ्यांवर 'बेस्ट' कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2018 07:08 PM2018-08-27T19:08:38+5:302018-08-27T20:27:43+5:30
अभिनेत्री माधवी जुवेकर व सात कर्मचा-यांना बेस्ट सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे.
मुंबई- अभिनेत्री माधवी जुवेकर व सात कर्मचा-यांना बेस्ट सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. गेल्या वर्षी दस-यात त्यांनी वडाळा आगारात नृत्य केले असता, त्यांच्यावर सहका-यांनी पैशांची उधळण केली होती. या प्रकरणाची चौकशी सुरू होती. हा अहवाल सादर झाल्यानंतर जुवेकर व सात कर्मचा-यांना सेवेतून काढण्यात आले.
गेल्या वर्षी दस-याच्या दिवशी वडाळा आगारात आयोजित कार्यक्रमातील नृत्याने बेस्टचे कर्मचारी चांगलेच अडचणीत आले आहेत. या कर्मचा-यांच्या नृत्याचा व्हिडीओ वायरल झाल्याने एकच खळबळ उडाली होती. विशेष म्हणजे या आक्षेपार्ह नृत्यात बेस्टमध्ये अधिकारी असलेली अभिनेत्री माधवी जुवेकरही दिसत होती. याची गंभीर दखल घेऊन बेस्ट प्रशासनाने संबंधित कर्मचारी-अधिका-यांवर कारवाईचे संकेत दिले होते.
दस-याच्या निमित्तानं नाचगाणी करीत पैसे उडवत असल्याचा व्हिडीओ आज सोशल मीडियावरून व्हायरल झाला होता. काही कर्मचारी आणि अधिकारी जुवेकर यांच्यावर पैसे उडवत असून त्यादेखील या व्हिडीओत तोंडामध्ये पैसे घेऊन नाचत असल्याचे दिसत होते. या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन महाव्यवस्थापक सुरेंद्र बागडे यांनी सुरक्षा आणि दक्षता अधिकाऱ्यांमार्फत या प्रकरणाची चौकशी सुरू केली होती. त्याच पार्श्वभूमीवर जुवेकर यांच्यासह 11 अधिकारी-कर्मचाऱ्यांवर चौकशीनंतर कारवाई करण्यात आली आहे.