दीपक भातुसे, लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : निवडणुकीच्या काळात लागू असणाऱ्या आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी आतापर्यंत किती खासदारांविरोधात दंडात्मक कारवाई करण्यात आली, याची माहितीच निवडणूक आयोगाकडे नसल्याची बाब समोर आली आहे.
२०१४ लोकसभा निवडणुकीपासून आचारसंहिता भंगप्रकरणी खासदारांना बजावण्यात आलेल्या नोटीस व दंडात्मक कारवाईची माहिती निवडणूक आयोगाकडे माहिती अधिकार कार्यकर्ते जितेंद्र घाडगे यांनी मागितली होती.
आचारसंहिता भंगप्रकरणी कारवाईबाबतचा संबंधित डेटा निवडणूक आयोगाने त्वरित प्रकाशित करून पारदर्शकतेला प्राधान्य द्यायला हवे. केवळ नोटीस बजावण्यापलीकडे ठोस कारवाई होत नसेल तर आचारसंहितेचा उपयोग काय? - जितेंद्र घाडगे, यंग व्हिसलब्लोअर्स फाउंडेशन
निवडणूक आयोग आचारसंहिता भंग प्रकरणी खासदारांचे वेगळे रेकॉर्ड ठेवत नाही. सर्व रेकॉर्ड एकत्रित संकलित केलेली असतात. - एस. चोक्कलिंगम, मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र