Join us

‘हुक्का पार्लर’विरोधात कारवाई करणार

By admin | Published: July 06, 2017 7:14 AM

मुंबईतील हुक्का पार्लरच्या माध्यमातून तरुण पिढी व्यसनाधीन होत असून, अपराधाकडे वळण्याची शक्यता आहे. त्यामुळे हुक्का पार्लरविरोधात

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबईतील हुक्का पार्लरच्या माध्यमातून तरुण पिढी व्यसनाधीन होत असून, अपराधाकडे वळण्याची शक्यता आहे. त्यामुळे हुक्का पार्लरविरोधात तातडीने अध्यादेश आणून कडक कारवाई करावी, अशी मागणी भाजपा आमदार मंगल प्रभात लोढा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. हुक्का पार्लरवर कारवाईच्या मागणीसाठी लोढा यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेत मागण्यांचे निवेदन सादर केले. हुक्का पार्लर्समधील उन्मुक्त वातावरणामुळे अनेक युवक अपराध करण्यासाठी प्रवृत्त होत आहेत. युवा पिढीच्या नाशाचे कारण बनण्याचे ठिकाण ठरत असलेल्या हुक्का पार्लर्सला तत्काळ बंद करणे गरजेचे आहे. अध्यादेश आणून हुक्का पार्लरांच्या विरोधात तत्काळ कडक कारवाई करावी, अशी मागणी लोढा यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. यापूर्वी काँग्रेस आघाडी सरकारने हुक्का पार्लर्सच्या विरोधात कठोर कारवाई करण्याची घोषणा केली होती. प्रत्यक्षात काहीच घडले नाही. त्यामुळे आता फडणवीस सरकारने याबाबत पुढाकार घ्यावा, अशी मागणी लोढा यांनी केली. यावर, सरकार याविषयी गंभीर आहे आणि हुक्का पार्लरांच्या विरोधात तत्काळ योग्य ती कारवाई केली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती लोढा यांनी दिली. लोढा यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळात विविध सामाजिक संस्थांशी संबंधित असलेले प्रशांत दाणी, जयेश जरीवाला तसेच भाजपा महिला मोर्चाच्या मलबार हिल अध्यक्षा श्वेता मांजरेकर, दक्षिण मुंबई भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष शरद चिंतनकर आणि भाजपा युवा मोर्चा मलबार हिल महामंत्री धर्मेंद्र दोशी आदींचा समावेश होता. मुंबई महानगर क्षेत्रातील सर्रास सुरू असलेल्या हुक्का पार्लरचे स्टिंग आॅपरेशन ‘लोकमत’ने केले होते. त्यानंतर या गंभीर विषयावर नव्याने चर्चा सुरू झाली. यापूर्वीही लोकमतने मुंबईत ड्रग्जच्या विळख्यातील तरुणाईचे विदारक चित्र मांडले होते.