काळबादेवीतील बेकायदा चिमण्यांवरील कारवाई म्हणजे ‘धूळफेक’, स्थानिकांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2018 03:36 AM2018-08-18T03:36:25+5:302018-08-18T03:36:36+5:30

सुवर्ण कारखान्यांवर बेकायदेशीररीत्या चिमणी बसवून काळबादेवी व झवेरी बाजार परिसरातील रहिवाशांच्या जिवाशी खेळणाऱ्या सुवर्णकारांविरोधात पालिकेने कारवाई सुरू केली खरी; मात्र काही महिन्यांतच कारवाई थंडावल्यामुळे...

The action against the illegal goldsmith of Kalbadevi is 'fake', the allegations of the locals | काळबादेवीतील बेकायदा चिमण्यांवरील कारवाई म्हणजे ‘धूळफेक’, स्थानिकांचा आरोप

काळबादेवीतील बेकायदा चिमण्यांवरील कारवाई म्हणजे ‘धूळफेक’, स्थानिकांचा आरोप

googlenewsNext

- शेफाली परब-पंडित
मुंबई  - सुवर्ण कारखान्यांवर बेकायदेशीररीत्या चिमणी बसवून काळबादेवी व झवेरी बाजार परिसरातील रहिवाशांच्या जिवाशी खेळणाऱ्या सुवर्णकारांविरोधात पालिकेने कारवाई सुरू केली खरी; मात्र काही महिन्यांतच कारवाई थंडावल्यामुळे पुन्हा एकदा चिमण्या डोके वर काढू लागल्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम (एमआरटीपी) कायद्यांतर्गत सुरू केलेली कारवाई ही केवळ धूळफेक असल्याची तीव्र नाराजी स्थानिक रहिवाशांकडून व्यक्त होत आहे.
दक्षिण मुंबईतील काळबादेवी, झवेरी बाजार या परिसरात सुवर्ण घडविणारे कारखाने आहेत. या कारखान्यांवरील बेकायदा चिमणीतून बाहेर पडणाºया विषारी वायूंमुळे स्थानिकांचे आरोग्य बिघडले आहे. त्यामुळे हे कारखाने बंद करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे. या प्रकरणी काळबादेवीतील स्थानिक रहिवाशांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे धाव घेतल्यानंतर येथील बेकायदा चिमणींवरील कारवाईला वेग आला होता. मात्र, काही दिवसांनी कारखान्यावर प्लॅस्टिकची नवीन चिमणी उभारण्यात येत असल्याचे दिसून आल्यानंतर संबंधितांवर एमआरटीपी कायद्यांतर्गत कारवाई करण्याचा निर्णय महापालिकेने चार महिन्यांपूर्वी घेतला.
काळबादेवी परिसरात २०२५ सुवर्णकारांचे कारखाने आहेत. गेल्या काही महिन्यांमध्ये सुमारे अडीचशे ते तीनशे कारखान्यांवरील चिमण्या काढण्यात आल्या आहेत. मात्र, काही ठिकाणी पुन्हा चिमण्या लावण्यात आल्या. या प्रकरणी काळबादेवी रेसिडेंट असोसिएशनने सी विभागाचे साहाय्यक आयुक्त सुनील सरदार यांची भेट घेतली. त्यानुसार लवकरच या दोन्ही संघटनांची बैठक बोलावून तोडगा काढण्याची तयारी पालिकेने दाखविल्याचे समजते. याबाबत साहाय्यक आयुक्त सुनील सरदार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आपण व्यस्त असल्याने नंतर बोलू, असे सांगितले.

संथ कारवाईने हैराण
काळबादेवी परिसरात या सुवर्ण कारखान्यांमुळे नागरिक गेल्या दोन दशकांहून अधिक काळ हैराण आहेत. मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर या कारखान्यांवरील कारवाईला गती मिळाली होती. त्यानंतरच्या बैठकीत महापालिकेने कठोर कारवाईचे आश्वासन दिले होते; परंतु परिस्थितीत काही सुधारणा नाही.
- हरकिशन गोराडिया, काळबादेवी रेसिडेंट असोसिएशन

...अशी होती पालिकेची आश्वासने

या सुवर्णकारांवर एमआरटीपी अंतर्गत कारवाईला सुरुवात झाली. मात्र त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यास टाळाटाळ केली जात आहे. पोलीस महापालिका यंत्रणेकडे, तर पालिका अधिकारी पोलिसांकडे बोट दाखवत आहेत.
हे निवासी क्षेत्र असल्याने आपली जागा सुवर्णकारांना देणाºया जागेच्या मालकांना जागेच्या वापरात बेकायदा बदल केल्याची नोटीस धाडण्यात येणार होती.
नियमांचे उल्लंघन करून २४ तास सुरू राहणाºया या कारखान्यांविरोधात कामगार आयुक्तांकडेही तक्रार दाखल करण्यात येणार होती.

आगीचा धोका
या कारखान्यातील अकुशल कामगार अतिज्वलनशील पदार्थ हाताळतात. बेकायदा सिंलिंडर्समुळे या कारखान्यांमध्ये आगीचा धोका संभवतो. कमला मिल कंपाउंडप्रमाणेच आगीची दुर्घटना या ठिकाणी घडण्याचा धोका स्थानिकांकडून व्यक्त करण्यात येतो.

Web Title: The action against the illegal goldsmith of Kalbadevi is 'fake', the allegations of the locals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.