नवी मुंबई : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व महानगरपालिकेने प्लॅस्टिकसह प्रदूषण पसरविणाºयांविरोधात मोहीम सुरू केली आहे. वाशीतील इनॉर्बिट मध्ये १० टन प्लॅस्टिकसाठा जप्त केला. प्लॅस्टिक कप बनविणाºया कारखान्यावर कारवाई करून घणसोलीमध्ये धूळ पसरविणारा आरएमसी प्लांट सील करण्यात आला आहे.
प्रदूषण नियंत्रण मंडळाने २७ सप्टेंबर ते १५ आॅक्टोबर दरम्यान प्लॅस्टिक विरोधी मोहीम सुरू केली आहे. यापूर्वी एपीएमसी परिसरामध्ये धाड टाकून ४ टन प्लॅस्टिक जप्त केले होते. शुक्रवारी वाशीतील इनॉर्बिट मॉलमध्ये धाड टाकली. या ठिकाणी तब्बल १० टन प्लॅस्टिकचा साठा आढळून आला आहे. एक ट्रक भरून प्लॅस्टिक जप्त करून महापालिकेच्या डम्पिंग ग्राउंडवरील सेलमध्ये पाठविण्यात आले आहे. आतापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. घणसोलीमधील मोहिनी एंटरप्रायझेस, बिकानेर स्वीट्स, पेरीज नॉवेल्टी, हॉटेल काशी कैलास, कोहिनूर स्वीट्स, सेक्टर २५ मधील जे के एंटरप्रायझेस व तळवली गाव येथील बिकानेर स्वीट्स या ७ दुकानांवर कारवाई करून प्रत्येकी पाच हजार प्रमाणे ३५ हजार दंड आकारण्यात आला आहे.
घणसोली सेक्टर ११ येथील आर. एन. ए. बिल्डर्स अॅण्ड डेव्हलपर्स यांच्या मोठ्या प्लांटच्या परिसरात धुळीचे साम्राज्य पसरले होते. प्लांटमधील वापरून झालेले पाणी रोडवर सोडून दिले जात होते. त्यामुळे रस्ता खराब होऊन अपघातांचे प्रमाण वाढले होते. या विषयी संबंधितांना सूचना देऊनही दखल घेतली जात नव्हती. यामुळे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाºयांशी झालेल्या चर्चेप्रमाणे आरएमसी प्लांटचा मुख्य दरवाजा सील करून कारवाई करण्यात आली आहे. वाशीमध्ये झालेल्या कारवाईमध्ये प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उप प्रादेशिक अधिकारी राजेंद्र पाटील, इंद्रजीत देशमुख, सुधीर पोटफोडे उपस्थित होते.
महापालिकेच्या वाशी, घणसोली येथील कारवाई आयुक्त रामास्वामी एन., अतिरिक्त आयुक्त रवींद्र पाटील, अमरिष पटनिगिरे, तुषार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली घणसोलीचे विभाग अधिकारी दत्तात्रेय नांगरे, वाशीचे विभाग अधिकारी महेंद्रसिंग ठोके, स्वच्छता अधिकारी सुधीर पोटफोडे, कविता खरात, प्रशांत नेरकर, रोहित ठाकरे, विष्णू धनावडे, प्रवीण थोरात, महेंद्र रुडे, भीमसिंग वळवी, विजय चौधरी व इतर अधिकारी, कर्मचारी यांचा सहभाग होता.पनीरमध्ये भेसळप्लॅस्टिक विरोधी मोहीम राबवत असताना घणसोली सेक्टर-२५ मध्ये नमो प्रोझन फूड या ठिकाणी दूध पावडर व तेल यांचे एकत्रित मिश्रण करून पनीर बनविले जात होते. महापालिकेच्या पथकाला ही गोष्ट निदर्शनास येताच, याबाबत अन्न व औषध प्रशासनास तातडीने माहिती देण्यात आली. रबाळे पोलीस स्टेशनलाही या विषयी कळविण्यात आले. या ठिकाणी ६३० लीटर भेसळयुक्त पनीर व ६०० लीटर दूध जप्त करण्यात आले. महापालिकेची ही महत्त्वाची कारवाई असून, नागरिकांनीही महापालिकेच्या पथकातील अधिकाºयांचे कौतुक केले आहे.कारखान्यावर कारवाईसेक्टर-२५ मधील जे के एंटरप्रायझेस या कारखान्यात प्लॅस्टिक कप बनविण्याचे काम सुरू होते. महापालिकेच्या अधिकाºयांना ही गोष्ट निदर्शनास येताच, त्या विषयी तत्काळ महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निदर्शनास आणून देण्यात आले. नियमाप्रमाणे संबंधितांवर कारवाई करण्यात आली आहे.घणसोली परिसरामध्ये प्रदूषण पसरविणारा आरएमसी प्लांट, प्लॅस्टिक विक्रेते व दुधामध्ये भेसळ करणाºयांवर कारवाई करण्यात आली. एका ठिकाणी प्लॅस्टिक कप बनविण्याचे निदर्शनास आले. आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.- दत्तात्रेय नांगरे,सहायक आयुक्त, घणसोलीप्लॅस्टिक विरोधात प्रदूषण नियंत्रण मंडळाने धडक मोहीम सुरू केली आहे. वाशीतील इनॉर्बिट मॉलमध्ये १० टन प्लॅस्टिकसाठा जप्त केला आहे. संबंधितांवर कारवाई करण्यात आली आहे. या अभियानामध्ये नागरिकांनीही सहभागी होऊन प्लॅस्टिकचा वापर करू नये. कोणीही प्लॅस्टिकचा साठा किंवा विक्री करत असल्याचे निदर्शनास आल्यास प्रशासनास कळवावे.- राजेंद्र पाटील, उपप्रादेशिक अधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळ