ST Workers Strike : ‘निलंबित कर्मचाऱ्यांवर कारवाई सुरूच राहणार’, अनिल परब यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2021 07:20 AM2021-12-01T07:20:54+5:302021-12-01T07:21:28+5:30

एसटी संपातील कर्मचाऱ्यांचे निलंबन मागे घेतल्यानंतरही अनेक कर्मचारी पुन्हा संपात सहभागी होत आहेत. अशा निलंबित कर्मचाऱ्यांवरील कारवाईची पुढील प्रक्रिया सुरूच राहणार आहे, असे परिवहनमंत्री ॲड. अनिल परब यांनी सांगितले.

'Action against suspended employees will continue' | ST Workers Strike : ‘निलंबित कर्मचाऱ्यांवर कारवाई सुरूच राहणार’, अनिल परब यांची माहिती

ST Workers Strike : ‘निलंबित कर्मचाऱ्यांवर कारवाई सुरूच राहणार’, अनिल परब यांची माहिती

Next

मुंबई : एसटी संपातील कर्मचाऱ्यांचे निलंबन मागे घेतल्यानंतरही अनेक कर्मचारी पुन्हा संपात सहभागी होत आहेत. अशा निलंबित कर्मचाऱ्यांवरील कारवाईची पुढील प्रक्रिया सुरूच राहणार आहे, असे परिवहनमंत्री ॲड. अनिल परब यांनी सांगितले.
एसटीचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्यात यावे, या आणि इतर मागण्यांसाठी सुरू असलेल्या एसटी कामगारांचा संप सुरू आहे; मात्र वेतनवाढीनंतर मोठ्या संख्येने कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत.
अनिल परब यांनी सांगितले की, संपात सहभागी झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. पण ते कर्मचारी कामावर रुजू झाल्यास त्यांचे निलंबन मागे घेतले जाईल, असे आदेश होते. 
त्यानुसार कर्मचाऱ्यांचे निलंबन मागे घेतलेही. पण अनेक कर्मचारी त्याचा गैरफायदा घेत आहेत. ते निलंबन मागे घेतल्यानंतर वेगवेगळी कारणे देऊन संपात सहभागी होत आहेत. त्यामुळे अशा निलंबित कर्मचाऱ्यांवरील कारवाईची पुढील प्रक्रिया सुरूच ठेवण्यात येईल.

Web Title: 'Action against suspended employees will continue'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.