मुंबई : केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांच्या दिल्लीतील कारचेप्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र पुणे, नागपूर व चंद्रपूर येथून उपलब्ध झाल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध करताच बोगस वायुप्रदूषण तपासणी(पीयूसी) मालकांचे धाबे दणाणले आहे. तसेच मोटार वाहन विभागानेही अशा वायुप्रदूषण तपासणी मालकांविरोधात नोटीस काढून कारवाईचा इशारा दिला आहे.वाहनाची तपासणी करून प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र घेतल्यावर वाहन रस्त्यावर आणता येते; अन्यथा १० हजार रुपये दंड व सहा महिन्यांपर्यंत शिक्षा भोगावी लागते. पण कित्येकवेळा तर वाहनाशिवायही प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र दिलेजात होते. केंद्र सरकारने एप्रिलपासून आॅनलाइन पीयूसीची सक्ती केली, मात्र वायुप्रदूषण तपासणी(पीयूसी) मालक संघटनेने उच्च न्यायालयात जाऊन त्यावर स्थगिती मिळविली. परंतु ९ सप्टेंबर रोजी उच्च न्यायालयाने ही स्थगिती उठविली तसेच आॅनलाइन पीयूसी करण्याचे आदेश दिले. तरीही केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या दिल्ली येथील कारची महाराष्ट्रात चार ठिकाणी पीयूसी काढण्यात आली. पण, कोणत्याही पीयूसी मालकाने कारबाबत माहिती न विचारताच पीयूसी केली होती. या वृत्तामुळे मुंबईतील वायुप्रदूषण तपासणी मालकांची चांगलीच धावपळउडाली आहे. तसेच मोटारवाहन विभागानेही आॅनलाइन पीयूसी करा; अन्यथा कारवाई करू, अशी नोटीस पीयूसी मालकांना पाठविली आहे.>न्यायालयाच्या आदेशानंतर आॅनलाइन पद्धतीने पीयूसी करण्याची सक्ती करण्यात आली आहे. बहुतांश ठिकाणी आॅनलाइन पद्धतीने पीयूसी होत असल्याने गाडीशिवाय पीयूसी होणार नाही. त्यामुळे बोगस पीयूसीचा प्रश्न नाही.- अभय देशपांडे, प्रवक्ते, मोटार वाहन विभाग
बोगस वायुप्रदूषण तपासणी करणाऱ्यांवर होणार कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2019 6:15 AM