मुंबई : अन्न आणि औषध प्रशासनाने केलेल्या तपासण्यांद्वारे आतापर्यंत १६ सॅनिटायझर उत्पादकांवर कारवाई केली आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी बाजारपेठांमध्ये नानाविध प्रकारची उत्पादने आली आहेत.मात्र एफडीएने तपासणी केलेल्या सॅनिटायझरच्या १६ नमुन्यांच्या अहवालापैकी तब्बल ८ नमुने अप्रमाणित आढळले आहेत. या बनावट सॅनिटायझरचा वापर आरोग्यासाठी घातक ठरू शकतो. त्यामुळे सॅनिटायझरची खरेदी करताना योग्य ती काळजी घ्या, असे आवाहन एफडीएने केले आहे.राज्यात १४२ कंपन्या सॅनिटायझरचे उत्पादन करत होत्या. पण मार्चपासून सॅनिटायझरची मागणी प्रचंड वाढल्याने ११० कारखान्यांनीही उत्पादन सुरू केले आहे. तर आता सुमारे २५२ कंपन्या व कारखाने सॅनिटायझरचे उत्पादन करत आहेत. त्यामुळे सॅनिटायझरचा मुबलक साठा राज्यात आहे.मात्र त्याच वेळी काही उत्पादक परिस्थितीचा फायदा घेत बनावट सॅनिटायझरची राजरोस बाजारात विक्री करत आहेत.एप्रिल ते जून या तीन महिन्यांत मोठ्या प्रमाणात मुंबईसह राज्यभरातून सॅनिटायझरचे नमुने घेतले आहेत. मागील तीन महिन्यांतील काही नमुन्यांचा तपासणी अहवाल येणे बाकी आहे. तर जुलै-आॅगस्टमध्येही नमुने घेतले असून तेही तपासणीसाठी पाठवले आहेत, अशी माहिती एफडीएचे आयुक्त अरुण उन्हाळे यांनी दिली आहे.ज्या उत्पादकांच्या ८ नमुन्यांचे अहवाल अप्रमाणित आले आहेत. त्या उत्पादकाविरोधात पुढील कारवाईची प्रक्रिया सुरू आहे. उत्पादकाविरोधात खटले दाखल करण्यात येत आहेत. आठपैकी सात उत्पादक हे परराज्यातील आहेत.म्हणजेच राज्याबाहेर बनावट सॅनिटायझरची निर्मिती मोठ्या संख्येने होते असे यातून स्पष्ट होत आहे. त्यामुळे याप्रकरणी कठोर कारवाईची हवी़
बनावट सॅनिटायझर उत्पादकांवर कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2020 2:03 AM