‘एसटीची प्रतिमा मलीन केल्यामुळे कारवाई’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2018 05:11 AM2018-06-21T05:11:25+5:302018-06-21T05:11:25+5:30

वेतनवाढीच्या निषेधार्थ ८ व ९ जून रोजी अघोषित संपात रोजंदार कामगारांचा कोणताही संबंध नव्हता, तरी देखील एसटी महामंडळाची प्रतिमा मलीन करण्याचा ठपका ठेवत एक हजार दहा कर्मचाऱ्यांचे सेवासमाप्तीचे आदेश काढल्याची माहिती बुधवारी महामंडळाने दिली.

'Action due to molestation of ST's' | ‘एसटीची प्रतिमा मलीन केल्यामुळे कारवाई’

‘एसटीची प्रतिमा मलीन केल्यामुळे कारवाई’

Next

मुंबई : वेतनवाढीच्या निषेधार्थ ८ व ९ जून रोजी अघोषित संपात रोजंदार कामगारांचा कोणताही संबंध नव्हता, तरी देखील एसटी महामंडळाची प्रतिमा मलीन करण्याचा ठपका ठेवत एक हजार दहा कर्मचाऱ्यांचे सेवासमाप्तीचे आदेश काढल्याची माहिती बुधवारी महामंडळाने दिली.
दोन महिन्यांपूर्वी रुजू झालेल्या नऊ हजार रोजंदार कर्मचाºयांचा २०१६-२०२० वेतन कराराशी संबंध नाही. तरीदेखील या कर्मचाºयांनी संपात सहभाग घेतला. संप काळात कामावर विनापरवाना गैरहजर राहिल्याने महामंडळाचा आर्थिक महसूल बुडाला. प्रवाशांची गैरसोय होऊन जनसामान्यांमध्ये एसटीची प्रतिमा मलीन झाल्याने या कर्मचाºयांना सेवामुक्त केले. रिक्त झालेल्या जागी प्रतीक्षा यादीवरील उमेदवारांना महामंडळात नोकरी देण्यात येईल, अशी एसटी महामंडळाकडून सांगण्यात आले.

Web Title: 'Action due to molestation of ST's'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.