Join us

वीज बिलांच्या वसुलीसाठी फुकट्या वीज ग्राहकांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 4:06 AM

मुंबई : दीर्घ काळापासून १.२० कोटी रुपयांच्या थकीत देयकांच्या वसुलीसाठी गुरुवारी आणि शुक्रवारी काशी मीरास्थित काशी गावातील पटेल कंपाउंडमधील ...

मुंबई : दीर्घ काळापासून १.२० कोटी रुपयांच्या थकीत देयकांच्या वसुलीसाठी गुरुवारी आणि शुक्रवारी काशी मीरास्थित काशी गावातील पटेल कंपाउंडमधील वीज ग्राहकांवर अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेडचे पथक आणि पोलीस यांनी संयुक्तपणे कारवाई केली. वीज तोडणीसह पुरवठा खंडित करण्याची कारवाई करत वीज चोरीचे पाच गुन्हेदेखील नोंदविण्यात आले.

वीज वितरण परवानाधारक म्हणून बीएसईएस लिमिटेड कार्यरत असणाऱ्या दिवसांपासून, म्हणजे जवळपास दोन दशकांपासून या ग्राहकांची थकबाकी प्रलंबित आहे. अनेक वेळा नोटीस दिल्या गेल्यानंतरही या क्षेत्रातील काही ग्राहक नियमित वीज देयक चुकते करण्यात कसूर करीत होते. वीज देयकांची थकबाकी वसूल करताना हे ग्राहक कायदा व सुव्यवस्थेत बिघाडाची परिस्थिती निर्माण करीत होते. इतर ग्राहकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी पोलिसांच्या पाठिंब्याने अशा ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित केला जाणे आवश्यक होते.

अशा फुकट्या ग्राहकांवर यापूर्वीही कारवाई सुरू केली गेली होती. त्यानुसार विद्युत पुरवठा खंडित केला गेला होता. विद्युत मीटर त्या ठिकाणावरून काढून टाकण्यात आले होते. जुलै २०१९ मध्येही पोलीस दलाची मदत व पाठबळासह यापूर्वीची वीज-तोडणी मोहीम राबविण्यात आली आहे. अशा प्रकरणांमध्ये अनधिकृत वीज पुरवठा आणि थकबाकीदार ग्राहकांचा पुरवठा खंडित केला. ज्यांनी वीज देयक भरले नाही, अशा सर्वांचे मीटर काढले आहेत. कसूर करणाऱ्यांविरुद्ध आणि ज्यांनी वीज चोरी केली त्यांच्यावर गुन्हे केले दाखल आहेत.