फेरीवाल्यांवर पालिकेची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2017 02:11 AM2017-08-03T02:11:10+5:302017-08-03T02:11:11+5:30

पावसाळ्यात उघड्यावरील अन्न खाऊन मुंबईकरांचे आजारी पडण्याचे प्रमाण वाढते. याची गंभीर दखल घेत, पालिका प्रशासनाने संपूर्ण मुंबईत पदपथांवरील अतिक्रमण हटविण्यास सुरुवात केली आहे.

Action on the hawkers | फेरीवाल्यांवर पालिकेची कारवाई

फेरीवाल्यांवर पालिकेची कारवाई

Next

मुंबई : पावसाळ्यात उघड्यावरील अन्न खाऊन मुंबईकरांचे आजारी पडण्याचे प्रमाण वाढते. याची गंभीर दखल घेत, पालिका प्रशासनाने संपूर्ण मुंबईत पदपथांवरील अतिक्रमण हटविण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार कुलाबा ते सायन, चर्चगेट ते माहीम, दादर ते दहिसर, करी रोड ते मुलुंडपर्यंत सर्वच विभागातील अनधिकृत फेरीवाल्यांना हटविण्यात आले आहे.
उघड्यावर अन्न शिजविण्यास उच्च न्यायालयाने मनाई केली आहे. तरीही मुंबईत अनेक रस्त्यांवर राजरोस अनधिकृत फेरीवाले खाद्यपदार्थांची विक्री करीत असतात. यामुळे गॅस्ट्रो, अतिसारसारखे आजार पसरतात. त्यामुळे पावसाळ्यात खबरदारी म्हणून रस्त्यांवरील फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात येते.
गेल्या काही दिवसांत
कुलाबा, मोहम्मद अली रोड, चिरा बाजार, ग्रँटरोड, भायखळा
विभागात रस्त्यावर खाद्यपदार्थ बनविणाºया विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली. यात २०३ फेरीवाल्यांवर कारवाई करत साहित्य जप्त करण्यात आले आहे.
तर परळ, दादर, प्रभादेवी येथील ७० अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आली. अंधेरी, गोरेगाव, मालाडमध्ये ४७ फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आली.वांद्रे, सांताक्रूज, अंधेरी पूर्व येथे ९९ अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आली.
कांदिवली, बोरीवली, दहिसर विभागांतील ७२ अनधिकृत फेरीवाल्यांना हटविण्यात आले.
तर घाटकोपर, मुलुंड, भांडुप
येथील ४६ फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आली. चेंबूर, गोवंडी, कुर्ला येथील ५४ फेरीवाल्यांच्या १३ चारचाकी हातगाड्या, १२ सिलिंडर्स आणि इतर साहित्य माल जप्त करण्यात आला.

Web Title: Action on the hawkers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.