मुंबई : उच्च न्यायालयाने फेरीवाल्यांच्या सीमारेषा निश्चित केल्यानंतर, मुंबई महापालिकेनेही तत्काळ पावले टाकत मुंबईत फेरीवाल्यांच्या सीमारेषा आखण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वे स्थानकांच्या दीडशे मीटर परिसरात ही लक्ष्मणरेषा आखण्यास सुरुवात झाली आहे. ही रेषा ओलांडल्यास फेरीवाल्यांवर कारवाई करण्याचे आदेशच आयुक्त अजय मेहता यांनी दिले आहेत.सर्वोच्च न्यायालयाने २००९मध्ये दिलेल्या निर्णयानुसार, रेल्वे स्थानकाच्या दीडशे मीटर, धार्मिक स्थळे, रुग्णालये, शैक्षणिक संकुल, मंड्यांच्या शंभर मीटर परिसरात फेरीवाल्यांना मज्जाव करण्यात आला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने १ नोव्हेंबर रोजी दिलेल्या निर्णयात रेल्वे स्थानकाच्या दीडशे मीटर परिसरात ना फेरीवाला क्षेत्र कायम ठेवले आहे. त्यामुळे पालिकेने फेरीवाल्यांसाठी हीच लक्ष्मणरेषा निश्चित करण्याचा निर्णय शुक्रवारी संध्याकाळी घेतला. मासिक आढावा बैठकीत फेरीवाला कारवाईचा आढावा घेताना, रेल्वे स्थानकांच्या दीडशे मीटर परिसरात फेरीवाले प्रवेश करू नये, म्हणून सीमारेषा आखण्याचे आदेश अधिकाºयांना दिले. त्यामुळे या रेषेच्या अलीकडील फेरीवाल्यांवर यापुढे थेट कारवाई करता येणार आहे. त्यासाठी गस्त ठेवण्याची गरज भासणार नाही, असा निष्कर्ष या बैठकीतून काढण्यात आल्याचे सूत्रांकडून समजते.येथे अंमलबजावणी सुरूदादर पश्चिम कबुतरखानापर्यंतच्या परिसरात फेरीवाल्यांना व्यवसायास मनाई करण्यात आली आहे. यासाठी दादर रेल्वे स्थानकाला जोडणाºया चार मार्गांवरील दीडशे मीटरच्या अंतरावर पालिकेने पांढºया रंगाच्या सीमारेषा आखल्या आहेत. दादर पश्चिमेला जोडणारा जावळे मार्ग, डिसिल्व्हा मार्ग, रानडे मार्ग, सेनापती बापट मार्गावर या सीमारेषा आखण्यात आल्या. रेषेअलीकडे बसणाºया फेरीवाल्यांवर कारवाई होणार आहे.- मुंबईतील वर्दळीच्या रेल्वे स्थानकांबाहेर नेहमीच अतिक्रमण निर्मूलन विभागाची गस्त ठेवावी लागत आहे. मात्र, लक्ष्मणरेषेमुळे हा त्रास संपणार आहे.- फेरीवाल्यांचा दंड ४८० रुपयांपासून ते ५० हजार रुपयांपर्यंत वाढविण्यात आला आहे.- खाद्यपदार्थ विकणाºया फेरीवाल्याकडे घरगुती वापराचा सिलिंडर आढळल्यास कंपनीवर कारवाईचा निर्णय.- स्टॉल्स थेट जमीनदोस्त करण्यात येत आहे.- रात्रीच्या खाद्यपदार्थांच्या स्टॉल्सवरील कारवाईसाठी खास पथक.
लक्ष्मणरेषा ओलांडणा-या फेरीवाल्यांवर कारवाई, पालिका आयुक्तांचा निर्णय, सीमारेषा आखणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 05, 2017 4:43 AM