कामोठा : सिडकोच्या अतिक्रमणविरोधी पथकाने अतिक्रमणविरोधात मोहीम हाती घेतली असून कामोठे परिसरात रस्त्यावर अतिक्रमण करणा:या फेरीवाल्यांवर रस्ते आणि पदपथ मोकळे करीत बुधवारी कारवाई करण्यात आली.
कामोठा वसाहतीतील रस्ते आणि पदपथ फेरीवाले, हातगाडीवाल्यांनी व्यापले असल्याने रहिवाशांना चालण्यासाठीही जागा राहिली नव्हती. फेरीवाल्यांमध्ये भाजी, मासळी, मटण, खाद्यपदार्थ विक्रेत्यांचा समावेश असून त्यांच्यामुळे स्वच्छतेचा बोजवारा उडत चालला होता. या व्यतिरिक्त वसाहत बकाल होत चालली होती. याची दखल घेत सिडकोचे अनधिकृत बांधकाम नियंत्रक अनिल पाटील यांच्या आदेशानुसार आज कामोठय़ात धडक मोहीम हाती घेण्यात आली.
बांधकाम नियंत्रक बी.डी.काकड यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक नियंत्रक एस.आर. राठोड, बीट अधिकारी सुनील कर्वे, जेसीबी, दोन ट्रक, पाच गाडय़ा, सिडकोचे 25 कर्मचा:यांच्या सहाय्याने पदपथावरील फेरीवाल्यांना उठवण्यात आले. त्याचबरेाबर त्यांनी बांधलेले तात्पुरते छप्पर, हातगाडय़ा जप्त करण्यात आल्या. सकाळी 11.3क् वाजता कामोठेच्या प्रवेशद्वारापासून मोहीम सुरु केली.
कामोठा वसाहतीत रस्त्यावर बस्तान बांधलेल्या अनधिकृत फेरीवाल्यांच्या स्टॉलवर हातोडा मारला. कारवाईत अडथळा येऊ नये म्हणून कामोठा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक o्रीराम मुल्लेमवार यांच्या नेतृत्वाखाली कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. (वार्ताहर)