मुंबई : पावसाळ्यात उघड्यावरील अन्न खाऊन मुंबईकरांचे आजारी पडण्याचे प्रमाण वाढते. याची गंभीर दखल घेत, पालिका प्रशासनाने संपूर्ण मुंबईत पदपथांवरील अतिक्रमण हटविण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार कुलाबा ते सायन, चर्चगेट ते माहीम, दादर ते दहिसर, करी रोड ते मुलुंडपर्यंत सर्वच विभागातील अनधिकृत फेरीवाल्यांना हटविण्यात आले आहे.उघड्यावर अन्न शिजविण्यास उच्च न्यायालयाने मनाई केली आहे. तरीही मुंबईत अनेक रस्त्यांवर राजरोस अनधिकृत फेरीवाले खाद्यपदार्थांची विक्री करीत असतात. यामुळे गॅस्ट्रो, अतिसारसारखे आजार पसरतात. त्यामुळे पावसाळ्यात खबरदारी म्हणून रस्त्यांवरील फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात येते.गेल्या काही दिवसांतकुलाबा, मोहम्मद अली रोड, चिरा बाजार, ग्रँटरोड, भायखळाविभागात रस्त्यावर खाद्यपदार्थ बनविणाºया विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली. यात २०३ फेरीवाल्यांवर कारवाई करत साहित्य जप्त करण्यात आले आहे.तर परळ, दादर, प्रभादेवी येथील ७० अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आली. अंधेरी, गोरेगाव, मालाडमध्ये ४७ फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आली.वांद्रे, सांताक्रूज, अंधेरी पूर्व येथे ९९ अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आली.कांदिवली, बोरीवली, दहिसर विभागांतील ७२ अनधिकृत फेरीवाल्यांना हटविण्यात आले.तर घाटकोपर, मुलुंड, भांडुपयेथील ४६ फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आली. चेंबूर, गोवंडी, कुर्ला येथील ५४ फेरीवाल्यांच्या १३ चारचाकी हातगाड्या, १२ सिलिंडर्स आणि इतर साहित्य माल जप्त करण्यात आला.
फेरीवाल्यांवर पालिकेची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2017 2:11 AM