मुंबई : बेकायदा बांधकामांवर सुरू असलेल्या कारवाईचा वेग गेल्या दोन महिन्यांत मंदावल्याचे दिसून येत आहे. मार्च महिन्यात कारवाईचे प्रमाण ३० टक्के होते. मात्र लोकसभाच्या रणधुमाळीत पालिकेचा कारभारही सुस्तावला, या काळात जेमतेम ११ टक्केच कारवाई झाली आहे.निवडणुकीच्या कामासाठी महापालिकेतील ११ हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांना घेण्यात आले. विभाग कार्यालयातील कर्मचारी यामध्ये सर्वाधिक असल्याने त्या-त्या विभागातील निर्मूलन विभागाची कारवाई थंडावली, असे सुत्रांकडून समजते. मार्च महिन्यात ४१४६ तक्रारींपैकी १२७८ वरकारवाई करण्यात आली. मात्र एप्रिल महिन्यात ४१०९ पैकी ४४१बेकायदा बांधकामांवरचे कारवाई झाली.मोठ्या संख्येने कर्मचारी निवडणुकीच्या कामात असल्याने कारवाई थांबली आहे. मतमोजणीनंतर कारवाई विभागात परत आल्यावर कारवाई वेग घेईल, असा दावा पालिका अधिकारी करीत आहेत. परंतु, पुढच्या महिन्यात पावसाला सुरूवात होत असल्याने पुढील चार महिने बेकायदा झोपडे आदींवर कारवाई थांबविण्यात येते. त्यामुळे बेकायदा बांधकामांना अधिक पेव फुटणार आहे.
बेकायदा बांधकामांवरील कारवाई मंदावली, निवडणुकीच्या काळात पालिकाही सुस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2019 6:36 AM