Join us

मनोरीत बेकायदा गेस्ट हाउसवर कारवाई

By admin | Published: May 30, 2017 6:48 AM

अग्निसुरक्षेचे नियम पायदळी तुडवत आपले व्यवसाय चालवणाऱ्या गोराई आणि मनोरी परिसरातील बेकायदा ४९ गेस्ट हाउसवर कारवाईची

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : अग्निसुरक्षेचे नियम पायदळी तुडवत आपले व्यवसाय चालवणाऱ्या गोराई आणि मनोरी परिसरातील बेकायदा ४९ गेस्ट हाउसवर कारवाईची कुऱ्हाड पडणार आहे. अग्निशमन दलानंतर आता महापालिकेच्या पी उत्तर विभागाच्या वैद्यकीय आरोग्य विभागानेही या गेस्ट हाउसविरुद्ध महापालिका अधिनियम ३९४ अन्वये कारवाई केली आहे. राष्ट्रीय भ्रष्टाचार आणि अपराध निवारक परिषदेचे अध्यक्ष मोहन कृष्णन यांनी या अनधिकृत गेस्ट हाऊसबाबत महापालिका आयुक्तांपासून मुख्यमंत्र्यांपर्यंत संबंधितांकडे लेखी तक्रार केली होती. त्या तक्रारीची दखल घेत अग्निशमन दलाने मनोरी परिसराला भेट देऊन येथील अनधिकृत गेस्ट हाऊस आणि लॉजिंगची पाहणी केली असता धक्कादायक बाबी उघडकीस आल्या. ४९ गेस्ट हाऊसमध्ये अग्निसुरक्षेसंबंधात कोणतीही यंत्रणा नसल्याचे तसेच नियम पाळण्यात आले नसल्याचे अग्निशमन दलाच्या अहवालात म्हटले आहे.मनोरी परिसर एमएमआरडीएच्या हद्दीत येतो आणि तेथील अशा अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याची जबाबदारी एमएमआरडीएची आहे, असे पी /उत्तर महापालिका कार्यालयाने एमएमआरडीएच्या कार्यकारी अभियंत्यांना कळवले आहे. तरी एमएमआरडीएही कोणतीच कारवाई करीत नाही, असे निवेदन मोहन कृष्णन यांनी महापौर, महापालिका आयुक्त, मुख्यमंत्री तसेच संबंधित विभागाने पाठवले असून त्यात याबाबत त्वरीत कारवाई करण्याची मागणी केली आहे. दरम्यान परिषदेने केलेल्य तक्रारीची दखल घेत उपराष्ट्रपती सचिवालयाने ही तक्रार पुढील कारवाहीसाठी राज्याच्या मुख्य सचिवांना पाठवली आहे.