नायजेरियन्सला आश्रय देणाऱ्यांवरही कारवाई

By admin | Published: October 13, 2016 04:14 AM2016-10-13T04:14:54+5:302016-10-13T04:14:54+5:30

एमडी रॉक या अमली पदार्थाच्या तस्करी प्रकरणी पोलिसांनी नायजेरियन व्यक्तीला अटक केली आहे. यापूर्वीही अनेक गुन्ह्यांमध्ये विदेशी नागरिकांना

Action on Nigerian refugees | नायजेरियन्सला आश्रय देणाऱ्यांवरही कारवाई

नायजेरियन्सला आश्रय देणाऱ्यांवरही कारवाई

Next

नामदेव मोरे / नवी मुंबई
एमडी रॉक या अमली पदार्थाच्या तस्करी प्रकरणी पोलिसांनी नायजेरियन व्यक्तीला अटक केली आहे. यापूर्वीही अनेक गुन्ह्यांमध्ये विदेशी नागरिकांना अटक केली असून ते सर्व बेकायदेशीरपणे शहरात वास्तव्य करत असल्याचे निदर्शनास आले होते. यामुळे भविष्यात नायजेरियन्स किंवा इतर कोणत्याही गुन्हेगारांना विनापरवाना घर भाड्याने देणाऱ्यांवरही गुन्हे दाखल करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.
अमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण व त्यांच्या पथकाने १० आॅक्टोबरला कोपरखैरणेमध्ये अमॅन्युएल बेंजामीन या नायजेरियन व्यक्तीला अटक केली. त्याच्याकडून ५५ हजार रूपये किमतीचे एमडी रॉक हस्तगत केले. नवी मुंबईमधील महाविद्यालयीन युवक, युवतींना अमली पदार्थांच्या जाळ्यात ओढले जात असल्याचे प्राथमिक तपासात उघडकीस आले आहे. नायजेरियन आरोपी त्याच्या साथीदारांच्या मदतीने रजनीगंधा पानसुपारी, गुटखा, सिगारेटमध्ये अमली पदार्थ मिसळून ते तरूणांना देत आहेत. अटक आरोपीची चौकशी केली जात असून तो एमडी कोठून घेवून येत होता, या रॅकेटमध्ये अजून कोणाचा समावेश आहे याची माहिती घेतली जात आहे. नवी मुंबईमध्ये वास्तव्य करत असूनही बेंजामीनची नोंद कोणत्याच पोलीस स्टेशनमध्ये नसल्याचे निदर्शनास आले आहे. याची गंभीर दखल पोलिसांनी घेतली आहे. यापुढे कोणत्याही गुन्ह्यामध्ये विदेशी नागरिकास अटक झाल्यानंतर त्याला आश्रय देणाऱ्यांवरही गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. घर भाड्याने देण्यापूर्वी संबंधित व्यक्तीचा पासपोर्ट व इतर सर्व माहिती तपासून घेणे आवश्यक आहे. भाडेकरूची माहिती स्थानिक पोलिसांना देणे आवश्यक असून तसे न केल्यास कारवाईला सामोेरे जावे लागेल असे स्पष्ट केले आहे.
नवी मुंबईमध्ये बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱ्या नायजेरियन नागरिकांची संख्या वाढत आहे. पूर्वी बोनकोडे, जुहूगाव परिसरात त्यांनी आश्रय घेतला होता. पण आता सिडको विकसित नोडमध्येही घरे भाड्याने घेवून ते वास्तव्य करत आहेत. याशिवाय खारघर व तळोजा परिसरामध्येही अनेकांनी आश्रय घेतला आहे. पासपोर्ट व व्हिसाची मुदत संपल्यानंतर नायजेरियन नागरिक या परिसरात येवून वास्तव्य करत आहेत. दुप्पट व त्याहीपेक्षा जास्त घरभाडे मिळत असल्याने अनेक जण पैशाच्या आमिषाने बेकायदेशीरपणे घरे भाड्याने देत आहेत. विदेशी नागरिकांना आश्रय देणे गुन्हा नाही. पण त्यांना आश्रय देताना त्यांचा मूळ पत्ता, पासपोर्ट व इतर सर्व माहिती घरमालकाने स्वत:जवळ ठेवावे, तो काय व्यवसाय करतो याचीही नोंद ठेवणे आवश्यक आहे. ज्यांच्याजवळ आवश्यक कागदपत्रे नसल्यास त्यांना आश्रय देणे गुन्हा असल्याचे स्पष्ट केले आहे.

Web Title: Action on Nigerian refugees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.