वाहतुकीचे नियम मोडल्यास डिलिव्हरी बॉयवर कारवाई; चारित्र्य पडताळणीही करावी लागणार- पोलीस आयुक्त संजय पांडे

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2022 06:33 AM2022-03-14T06:33:51+5:302022-03-14T06:37:35+5:30

रविवारी संजय पांडे यांनी फेसबुक लाईव्ह करत मुंबईकरांशी संवाद साधला.

Action on delivery boy in case of violation of traffic rules | वाहतुकीचे नियम मोडल्यास डिलिव्हरी बॉयवर कारवाई; चारित्र्य पडताळणीही करावी लागणार- पोलीस आयुक्त संजय पांडे

वाहतुकीचे नियम मोडल्यास डिलिव्हरी बॉयवर कारवाई; चारित्र्य पडताळणीही करावी लागणार- पोलीस आयुक्त संजय पांडे

Next

मुंबई : ऑनलाइन मागवलेले खाद्यपदार्थ लवकर पोहोचविण्यासाठी विविध कंपन्यांमध्ये चढाओढ लागली आहे.  झटपट डिलिव्हरी करण्यासाठी अनेक वेळा डिलिव्हरी बॉयकडून वाहतूक नियमांचे उल्लंघन होते. तसेच, अनेकदा लूटमारीच्याही घटना घडल्यामुळे डिलिव्हरी बॉय तसेच संबंधित कंपन्यांना शिस्त लावण्यासाठी नवीन पोलीस आयुक्त संजय पांडे मैदानात उतरले आहेत. त्यांनी डिलिव्हरी बॉयच्या नियुक्तीदरम्यान चारित्र्य पडताळणी आवश्यक असल्याच्या सूचना रविवारी दिल्या आहेत. तसेच, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात थेट गुन्हे दाखल होणार आहेत. यामध्ये डिलिव्हरी बॉयबरोबर कंपन्यांनाही जबाबदार धरण्यात येणार असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. 

रविवारी संजय पांडे यांनी फेसबुक लाईव्ह करत मुंबईकरांशी संवाद साधला. यावेळी संवाद साधताना त्यांनी मुंबईच्या अनेक मुद्द्यांवरून भाष्य केले आहे. यामध्ये वाहतूक, ध्वनिप्रदूषण तसेच बेशिस्तपणे गाडी चालवणारे डिलिव्हरी बॉय संदर्भात महत्त्वपूर्ण सूचना दिल्या आहेत. पांडे म्हणाले की, माझ्याकडे अनेक नागरिकांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन करत गाडी चालवणाऱ्या डिलिव्हरी बॉयच्या तक्रारी केल्या आहेत. यापुढे डिलिव्हरी बॉयने वाहतुकीचे नियम मोडले, तसेच विरुद्ध दिशेने गाडी चालवताना आढळल्यास डिलिव्हरी बॉयसह ते काम करत असलेल्या संबंधित कंपनीवरही कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. 

तसेच, या डिलिव्हरी बॉय संबंधित नियमावलीही जारी करण्यात आली आहे. यामध्ये डिलिव्हरी बॉयची नियुक्ती करताना चारित्र्य पडताळणी अहवाल प्राप्त करणे आवश्यक आहे. त्यांना सेवा पुरवण्यासंदर्भात आवश्यक ते प्रशिक्षण देण्यात यावे. तसेच त्यांच्या कामाबाबतचे करारपत्र व आवश्यक ती सर्व कागदपत्रे जमा करून घेणे गरजेचे राहणार आहे. तसेच अनेकदा डिलिव्हरी बॉय क्षमतेपेक्षा जास्त वजनाचे, आकाराचे सामान घेऊन दुचाकी चालवतात. याबाबतही कंपनी चालकाने दक्षता घ्यावी, अन्यथा संबंधितांवर कारवाई करण्यात यावी.  तसेच त्यांना व्यवस्थित गणवेश परिधान करण्यास सांगावे, अशा सूचना आयुक्तांची दिल्या आहेत.
 

Web Title: Action on delivery boy in case of violation of traffic rules

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.