राजकीय द्वेषातून कारवाई, पण तपासात सहकार्य करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:06 AM2021-05-12T04:06:29+5:302021-05-12T04:06:29+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : आपल्याकडून कोणत्याही प्रकारचे गैरकृत्य झाले नसताना केंद्र सरकारने राजकीय द्वेषातून गुन्हा दाखल केला आहे. ...

Action out of political hatred, but will co-operate in the investigation | राजकीय द्वेषातून कारवाई, पण तपासात सहकार्य करणार

राजकीय द्वेषातून कारवाई, पण तपासात सहकार्य करणार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : आपल्याकडून कोणत्याही प्रकारचे गैरकृत्य झाले नसताना केंद्र सरकारने राजकीय द्वेषातून गुन्हा दाखल केला आहे. मात्र जसे सीबीआयला सहकार्य केले तसेच ईडीच्या तपासातही सहकार्य करणार, अशी प्रतिक्रिया राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. ‘सत्य परेशान हो सकता हे, लेकिन पराजित नही’, अशा शब्दात त्यांनी आपण निर्दोष असल्याचा दावा केला.

देशमुख म्हणाले, मीडियाच्या माध्यमातून माहिती मिळाली आहे की, ईडीकडून माझी चौकशी होणार आहे. मी काेणताही गुन्हा केेलेला नाही, हे सर्व राजकीय हेतूपोटी सुरू आहे. मी गृहमंत्री असताना काही महत्त्वाचे निर्णय घेतले. प्रामुख्याने सीबीआयची स्थापना झाल्यापासून महाराष्ट्रात कोणत्याही प्रकरणाचा तपास करायचा असेल तर राज्य सरकारच्या परवानगीची गरज नव्हती. परंतु ऑक्टोबरमध्ये गृहविभागाने त्यासाठी राज्य सरकारची परवानगी घेणे बंधनकारक केले. त्यानंतर अनेक राज्यांनी त्याप्रमाणेच निर्णय घेतला. दादरा नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांच्या मुंबईतील आत्महत्याप्रकरणी योग्य तपास होण्याची मागणी अनेक आमदारांनी अधिवेशनात केली होती. त्यावरून मी एसआयटी गठीत करण्याची घाेषणा केली हाेती. तसेच अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात गुन्हा दाखल करून योग्य तपास सुरू केला. या सर्व गोष्टींमुळेच केंद्र सरकार कारवाई करीत असल्याचा दावा त्यांनी केला.

........................................

Web Title: Action out of political hatred, but will co-operate in the investigation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.