सुरक्षित मुंबईसाठी कृती आराखडा

By admin | Published: June 27, 2014 01:05 AM2014-06-27T01:05:21+5:302014-06-27T01:05:21+5:30

स्त्रियांना अल्प काळासाठी आश्रय मिळू शकेल अशा सुरक्षित जागा मुंबईत अत्यंत कमी उरल्या असल्याचे धक्कादायक वास्तव एका संस्थेने राबविलेल्या प्रकल्पातून उजेडात आली.

Action plan for safe Mumbai | सुरक्षित मुंबईसाठी कृती आराखडा

सुरक्षित मुंबईसाठी कृती आराखडा

Next
>मुंबई : स्त्रियांना अल्प काळासाठी आश्रय मिळू शकेल अशा सुरक्षित जागा मुंबईत अत्यंत कमी उरल्या असल्याचे धक्कादायक वास्तव एका संस्थेने राबविलेल्या प्रकल्पातून उजेडात आली. त्यामुळे स्त्रियांसाठी सुरक्षित मुंबई घडविण्याकरिता महापालिकेने पुढाकार घेतला असून लवकरच कृती आराखडा तयार होणार आह़े यासाठी नगरसेवक व जनतेकडून सुचना मागविण्यात आल्या आहेत़
महिलांसाठी सुरक्षित मुंबई या प्रकल्पाच्या अभ्यासातून ही बाब समोर आली़ 2क्14-2क्34 या 2क् वर्षासाठी शहराचे नियोजन करताना स्त्रियांचाही विचार होण्याची गरज असल्याचा मतप्रवाह या अभ्यासातून पुढे आला आह़े त्यानुसार सुरक्षित मुंबईसाठी पालिकेचे सावित्री बाई फुले स्त्री संशोधन केंद्र व बिगर शासकीय संस्थांमार्फत कृती आराखडा तयार करण्यात येत आह़े 
अशी माहिती पालिकेच्या विशेष सभेत आज देण्यात आली़ कार्यालयीन ठिकाणी सुरक्षित वातावरण, रात्री उशीरार्पयत वाहतूक व्यवस्था, पादचारी मार्ग-रस्ते-स्कायवॉक, स्टेशन असे परिसर सुरक्षित करणो, स्त्रियांचे आरोग्य व शिक्षण यावर या अभ्यासात चौफेर विचार केला आह़े मात्र यात महिलांचे सुचना घेणोही आवश्यक असल्याने 15 जुलैर्पयत कळविण्याचे आवाहन पालिकेने केले आह़े (प्रतिनिधी)
 
वाढती विषमता, सहिष्णूवृत्तीचा अभाव, पायाभूत सुविधांची बदलती स्थिती अशा बाबींचा परिणाम थेट स्त्रियांच्या सुरक्षेवर होऊ जागला आहे. महिलांच्या सर्वागीण विकासासाठी येत्या पाच वर्षाचा आराखडा तयार करण्यात 
येत आह़े  यासाठी अशासकीय संस्थेचे सहकार्य घेण्यात येणार असून महापौरांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली जाणार आहे.
 
या समितीच्या अधिपत्याखाली 
महिलांचे समाजिक-आर्थिक, आरोग्य, शिक्षण यावर विशेष  भर कृती आराखडय़ात देण्यात येणार आह़े
 
बसमध्ये महिला प्रवाशांची सुरक्षा, शाळा-शिकविणाला जाताना मुलींची छेडछाड होत असल्यास त्यांच्या सुरक्षेचा विचार केला जाणार आह़े  सावित्रीबाई फुले स्त्री संशोधर केंद्र, राजगृह कॉ. सो. बाळशेठ मडूरकर मार्ग, एलफिस्टन यावर सूचना पाठवाव्यात, असे आवाहन पालिकेने केले आह़े

Web Title: Action plan for safe Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.