नवी मुंबई : कोपरखैरणे सेक्टर-१९ येथील स्वामिनी आयुर्वेदिक पंचकर्मा सेंटरवर वेश्याव्यवसायावरून पिटाअंतर्गत कोपरखैरणे पोलीसांनी शुक्रवारी कारवाई केली.पंचकर्म सेंटरमध्ये हा वेश्याव्यवसाय चालवला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली असता शुक्रवारी दुपारी त्या ठिकाणी बनावट ग्राहक पाठवण्यात आले. यावेळी तिथे काम करणाऱ्या चार महिलांमार्फत वेश्याव्यवसाय चालवला जात असल्याचे उघड झाले. त्यानुसार छापा टाकून सेंटर चालकांवर कारवाई केल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक नाईक यांनी सांगितले. लिझा वर्गीस व विनय श्रीधर या दोघांनी पंचकर्मा सेंटरच्या नावाखाली हा वेश्याव्यवसाय सुरू ठेवला होता. याकरिता तिथे चार महिला ठेवण्यात आल्या होत्या. त्या मुंब्रा, कळवा व कोपरखैरणेतील राहणाऱ्या आहेत. या सर्वांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत. (प्रतिनिधी)
पंचकर्म सेंटरमधील वेश्याव्यवसायावर कारवाई
By admin | Published: June 28, 2015 1:23 AM