Join us

रेती उपसा करणा-यांवर कारवाई

By admin | Published: November 21, 2014 11:20 PM

तालुक्यातील कुंडलिका नदीच्या पात्रातून अवैधरीत्या रेतीउत्खनन करणाऱ्यांविरोधात महसूल प्रशासनाने गेले तीन दिवस धडक मोहीम उघडल्याने अवैधरीत्या रेती उत्खनन करणाऱ्यांची पळापळ झाली आहे

रोहा : तालुक्यातील कुंडलिका नदीच्या पात्रातून अवैधरीत्या रेतीउत्खनन करणाऱ्यांविरोधात महसूल प्रशासनाने गेले तीन दिवस धडक मोहीम उघडल्याने अवैधरीत्या रेती उत्खनन करणाऱ्यांची पळापळ झाली आहे. महसूल प्रशासनाने ही कारवाई केल्याने रोह्यात खळबळ उडाली आहे. रोहा तालुक्यातील कुंडलिका नदीच्या पात्रात अवैधरीत्या रेतीउत्खनन सुरु होते. याविरोधात उपविभागीय अधिकारी सुभाष भागडे आणि तहसीलदार ऊर्मिला पाटील यांच्यासह महसूल प्रशासनाने गेले तीन दिवस धडक मोहीम उघडली होती. प्रशासनाने कुंडलिका नदीच्या दोन्ही बाजूकडील अवैध रेती उपसा पूर्णपणे बंद केला. या अचानक कारवाईने अवैधरीत्या रेती उत्खनन करणाऱ्यांची पळापळ उडाली आहे. रेती उत्खनन यंत्रणांची मिळेल त्या ठिकाणी लपवालपवी केली आहे. या प्रकरणी प्रशासनाने कारवाई करीत काही सक्शन पंप आणि होड्या जप्तही केल्या आहेत. (वार्ताहर)