वीज चोरी करणाऱ्यांना कारवाईचा शॉक; महावितरणाची भूमिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 04:21 PM2021-09-17T16:21:16+5:302021-09-17T16:25:01+5:30

बाह्य उपकरणे तथा इलेक्ट्रॉनिक साधनांचा वापर करुन मीटरमध्ये फेरफार घडवून आणणे म्हणजे वीज चोरी आहे.  

Action shock to power thieves; The role of MSEDCL | वीज चोरी करणाऱ्यांना कारवाईचा शॉक; महावितरणाची भूमिका

वीज चोरी करणाऱ्यांना कारवाईचा शॉक; महावितरणाची भूमिका

googlenewsNext

मुंबई : वीज चोरी करणे एक अपराध आहे. वीज चोरी करणाऱ्यांविरुद्ध महावितरणने कारवाई सुरु केली आहे. अनधिकृतपणे विजेचा वापर करीत असल्याचे आढळल्यास महावितरण तर्फे कठोर कारवाई करण्यात येईल. त्यामुळे लोकांनी अधिकृतपणे विजेचा वापर करावा. तसेच वेळेत वापरलेल्या विजेचे पैसे भरावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

बाह्य उपकरणे तथा इलेक्ट्रॉनिक साधनांचा वापर करुन मीटरमध्ये फेरफार घडवून आणणे म्हणजे वीज चोरी आहे.  मीटरमधील फेरफार कलम १३५ विद्युत कायदा २००३ अंतर्गत वीज चोरी प्रकारात मोडतो. सदर वीज चोरी करणाऱ्याविरुद्ध कलम १३५ नुसार, वीज चोरीची तक्रार पोलिसांत (एफआयआर) दाखल करण्यात येते.

Web Title: Action shock to power thieves; The role of MSEDCL

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.