खाजगी सावकारी करणा-या एसटी कर्मचा-यांवर कारवाई; व्याजाने पैसे देणा-यांवर बडगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2018 12:16 AM2018-02-11T00:16:04+5:302018-02-11T00:16:37+5:30

एसटीतील कर्मचा-यांच्या आर्थिक अगतिकतेचा गैरफायदा घेऊन अनधिकृतपणे खाजगी सावकारी व्यवसाय करणा-या एसटीतील काही तथाकथित अधिकारी/कर्मचा-यांवर यापुढे कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी, असे निर्देश परिवहनमंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी एसटी प्रशासनास दिले होते.

Action on ST Employees who make private lenders; Interest will be paid on the payers | खाजगी सावकारी करणा-या एसटी कर्मचा-यांवर कारवाई; व्याजाने पैसे देणा-यांवर बडगा

खाजगी सावकारी करणा-या एसटी कर्मचा-यांवर कारवाई; व्याजाने पैसे देणा-यांवर बडगा

Next

मुंबई : एसटीतील कर्मचा-यांच्या आर्थिक अगतिकतेचा गैरफायदा घेऊन अनधिकृतपणे खाजगी सावकारी व्यवसाय करणा-या एसटीतील काही तथाकथित अधिकारी/कर्मचा-यांवर यापुढे कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी, असे निर्देश परिवहनमंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी एसटी प्रशासनास दिले होते. त्यानुसार एसटीच्या सुरक्षा व दक्षता विभागामार्फत तातडीने परिपत्रक काढून अशा प्रकारे अवैध पद्धतीने व्याजाने पैसे देणाºया अधिकारी/कर्मचाºयांवर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश स्थानिक एसटी प्रशासनाला दिले आहेत.
एसटी महामंडळात सुमारे १ लाख कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांच्या आर्थिक गरजा भागविण्यासाठी मध्यवर्ती स्वरूपाची एसटी कर्मचारी सहकारी बँक अस्तित्वात आहे. तसेच स्थानिक पातळीवर काही कर्मचाºयांनी एकत्र येऊन सरकारी पतसंस्थांची स्थापना केली आहे. याबरोबरच एसटीच्या कर्मचाºयांना त्यांच्या वेतनावर आधारित सरकारी व सहकारी बँकांतून पतपुरवठा केला जाऊ शकतो. असे असताना कर्मचाºयांच्या अज्ञानाचा व आर्थिक अगतिकतेचा गैरफायदा घेऊन त्यांच्यातील काही कर्मचारी व अधिकारी अवैधरीत्या खाजगी सावकारीच्या माध्यमातून तब्बल १० ते ३० टक्के प्रति महिना या दराने पैसे व्याजाने देत असल्याबाबत व त्याच्या वसुलीसाठी बेकायदेशीररीत्या या कर्मचा-यांवर दबाव आणत असल्याच्या तक्रारी रावते यांच्याकडे कर्मचा-यांनी केल्या होत्या.
ग्रामीण व शहरी भागातील एसटीच्या आगारात कर्मचा-यांच्या ‘भिशी’च्या नावाखाली असा छुपा खाजगी सावकारांचा धंदा फोफावला होता. एसटीतील अनेक कर्मचारी अशा खाजगी सावकारीच्या पाशात अडकले होते. काही ठिकाणी या तथाकथित सावकारीच्या अत्याचाराविरुद्ध पोलीस स्थानकात तक्रारीपण दाखल झाल्या होत्या.

व्याजासाठी दबाव
काही एसटीचे अधिकारी/पर्यवेक्षक आपल्या अधिकाराचा गैरवापर करून आर्थिकदृष्ट्या नडलेल्या कर्मचाºयांना व्याजाने पैसे घेण्यास प्रवृत्त करीत, नंतर व्याजासाठी त्यांच्यावर अवैधरीत्या दबाव आणत असत. अशा अनधिकृत सावकारांच्या धाकदपटशाहीमुळे संबंधित कर्मचारी त्यांना टाळण्यासाठी व तोंड लपविण्यासाठी आपल्या दैनंदिन कामावर गैरहजर राहू लागले. साहजिकच त्याचा विपरीत परिणाम एसटीच्या कामकाजावर होऊ लागला.
हे गैरप्रकार थांबविण्याच्या हेतूने एसटी महामंडळाच्या आवारात बेकायदेशीर व अनधिकृतरीत्या व्याजाने पैसे देणे/घेणेबाबतचे व्यवहार करणाºया व्यक्तींवर भारतीय दंड संहिता व महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ अन्वये दखलपात्र गुन्हा नोंदविण्याचे आदेश मुख्य सुरक्षा व दक्षता अधिकारी मनोज लोहिया यांनी परिपत्रकाद्वारे दिले आहेत. या कारवाईमुळे भविष्यात एसटीच्या सर्वसामान्य कामगारांचे आर्थिक शोषण करणाºया अशा खाजगी सावकारीला लगाम बसेल, अशी अपेक्षा वर्तवण्यात येत आहे.

Web Title: Action on ST Employees who make private lenders; Interest will be paid on the payers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.