Join us

दिवसभरात 1क्82 वाहनांवर कारवाई

By admin | Published: September 01, 2014 10:42 PM

वाहतूक नियमांचे उल्लंघन करणा:या वाहनधारकांविरोधात 31 ऑगस्टला पोलिसांनी विशेष मोहीम राबविली होती.

नवी मुंबई : वाहतूक नियमांचे उल्लंघन करणा:या वाहनधारकांविरोधात 31 ऑगस्टला पोलिसांनी विशेष मोहीम राबविली होती. एका दिवसामध्ये तब्बल 1क्82 जणांवर कारवाई करून 985क्क् रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. 
नवी मुंबई, पनवेल, उरण परिसरामध्ये वाहनधारकांकडून विशेषत: दुचाकी चालकांकडून नियमांचे मोठय़ाप्रमाणात उल्लंघन होत आहे. वाहतूक पोलिस नियमित कारवाई करत असतात. सुरक्षेसाठी जनजागृतीही केली जात आहे. परंतु याचा काहीही परिणाम झालेला नाही. 9क् टक्के दुचाकीस्वार हेल्मेटचा वापर करत नाहीत. सिग्नल तोडणो व इतर नियमही धाब्यावर बसविले जात आहेत. हा बेशिस्तपणा कमी करण्यासाठी पोलीस उपआयुक्त अरविंद साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली 31 ऑगस्टला पूर्ण आयुक्तालय क्षेत्रमध्ये विशेष मोहीम राबविली. महत्त्वाचे चौक व रोडवर पोलिसांनी वाहनांची तपासणी सुरू केली.
पोलिसांनी एक दिवसामध्ये तब्बल 1क्82 जणांवर कारवाई केली आहे. यामध्ये सर्वाधिक 957 जणांकडे हेल्मेट नसल्याचे निदर्शनास आले आहे. 28 जण दोनपेक्षा जास्त प्रवासी घेवून दुचाकी चालवत होते. लायसन्स नसलेले 33, कागदपत्र जवळ नसलेले 57 व सिग्नल तोडणा:या 7 जणांचा समावेश आहे. या सर्वाकडून 985क्क् रुपये दंड वसूल केला आहे. हेल्मेट न घातल्यामुळे व इतर नियम तोडल्यामुळे अपघातामध्ये दुचाकीस्वार ठार होण्याच्या घटना वाढत आहेत.  अनेक जण गंभीर जखमी होत आहेत. अपघात कमी व्हावे यासाठी कारवाई करण्यात येत असून यापुढेही मोहीम सुरू राहणार असल्याची माहिती पोलीस उपआयुक्त अरविंद साळवे यांनी दिली. 
 
31 ऑगस्टला केलेल्या कारवाईचा तपशील 
प्रकारदाखल केसदंड
बिगर हेल्मेट957866क्क्
ओव्हरसीट2831क्क्
लायसन्स नसणो3334क्क्
कागदपत्र नसणो575क्क्क्
सिग्नलचे उल्लंघन 74क्क्